Ladki Bahin Yojana Arj New Last Date Apply Online.
सर्वांना नमस्कार, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थींना या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे (Ladki Bahin Yojana Arj KarnyasNew Last Date Apply Online) माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यभरातील लाखो महिलांनी लाभ घेतला आहे.
मात्र या योजनेसाठी अद्याप अर्ज न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेंतर्गत Ladki Bahin Yojana Arj राज्यातील पात्र महिलांना दरमहा रु.१,५०० रुपये दिले जातात. या योजनेसाठी राज्यातील लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र, अजूनही काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
अजूनही या योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती, परंतु राज्य सरकारच्या या लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana Arj New Last Date Apply Online) साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता एक महिन्याने वाढवण्यात आली आहे.
‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ !
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिन” योजना राबविण्यात येत आहे. शासन निर्णय. सदर योजनेतील दि. ०३.०७.२०२४ च्या परिच्छेद (ड) मध्ये सदर योजनेत महिला लाभार्थी दि. ३१.०८.२०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच दि. ३१.०८.२०२४ पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांनी दि. ०१.०७.२०२४ पासून दरमहा रु. १५००/- आर्थिक लाभ दिला जाईल.
या माहिमेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दि. ३१.०८.२०२४ नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना महिना सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, Ladki Bahin Yojana Arj या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.”
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
३१ जुलै २०२४ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढ.
नवीन शासन निर्णय GR
योजनेसाठी पात्रता:
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला.
- वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा.
- अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे.
- अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल.
- ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
आवश्यक कागदपत्रे:
- ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा.
- आधार कार्ड आवश्यक.
- राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला.
- बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड.
- योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
- अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक.
अर्ज भरण्याची सुविधा:
- अंगणवाडी केंद्रे
- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये
- ग्रामपंचायत कार्यालये
- महापालिकेचे वॉर्ड (झोन) ऑफिस
- सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्रे
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णयः
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण –Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास Ladki Bahin Yojana Arj मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन वेबपोर्टल वरून अर्ज करण्याची प्रोसेस.
Ladki Bahin Yojana Apply Online.
सर्वप्रथम खालील मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत (Ladki Bahin Yojana Web Portal) वेबपोर्टल लिंक वर क्लिक करा.
https://ladakibahin.maharashtra.gov.in
पोर्टल ओपन झाल्यावर वरती मुख्य मेनू मध्ये अर्जदार लॉगिन मेनू वर क्लिक करा.
- अर्जदार लॉगिन मेनू वर क्लिक केल्यानंतर प्रथम Create Account वर क्लिक करून ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा आवश्यक तपशील व कॅप्चा कोड टाकून Signup क्लिक करा.Ladki Bahin Yojana Arj.
- Signup क्लिक केल्या नंतर मोबाईलवर OTP येईल तो OTP टाकून पुन्हा कॅप्चा कोड टाकून verify otp वर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे खाते तयार करा. खाते तयार झाल्या नंतर मोबाईल क्रमांक, पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून लॉगीन करा.
- लॉगिन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज’ या मुख्य मेनू पर्यायावर क्लिक करा.
- पुढे आपला आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाकून Validate Aadhar वर क्लिक करा.Ladki Bahin Yojana Arj
- पुढे नोंदणी अर्जामध्ये महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पिनकोड, वैवाहिक स्थिती, आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? इ. तपशील भरा.
- पुढे आधार कार्डानुसार अर्जदाराचा पत्ता / महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती भरा आणि अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील भरा.
- आवश्यक सर्व माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (हमीपत्र डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा.Ladki Bahin Yojana Arj.
- पुढे हमीपत्राचा अस्वीकारण स्वीकारा वर क्लिक करा व Submit या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि कॅप्चा कोड टाकून ‘Submit’, या पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज संपूर्ण भरून सबमिट केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) जाणून घेऊ शकता.
- हमीपत्र PDF फाईल : हमीपत्र येथे क्लिक करून डाउनलोड करा आणि आवश्यक तपशील भरून ऑनलाईन फॉर्म मध्ये अपलोड करा.
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२४ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढ.
खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !
Ladki Bahin Yojana Arj Apply Online
ही माहिती देखील बघा.
जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा?
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥