Kadba Kutti Machine Anudan Yojana 2024: कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना:शेतकऱ्यांना मिळणार २० हजार रुपयांची कडबा कुट्टी मशीन; सरकार देणार पैसे, येथून करा ऑनलाईन अर्ज..,

Kadba Kutti Machine Anudan Yojana. 

नमस्कार मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात, तसेच शैक्षणिक, कर्ज योजना अशा अनेक योजना शासन राज्यातील नागरिकांसाठी राबविते. ग्रामीण भागात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात आढळतो.

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन ही एक अत्यावश्यक वस्तू आहे. जर शेतकऱ्यांकडे जास्त जनावरे असतील, तर कडब्याचे बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालणे हे एक कष्टाचे काम असते, आणि हे काम सोपे करण्यासाठी कडबा कुट्टी मशीन उपयोगी ठरते. मात्र, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता, त्यांना कडबा कुट्टी मशीन विकत घेणे नेहमी शक्य होत नाही.

ग्रामीण भागांमध्ये गाई-म्हशी किंवा इतर जनावरे मोठ्या प्रमाणात असतात, आणि शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी चारा आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. विशेषतः चारा कापण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात, आणि जनावरे जास्त असल्यास हे कष्ट आणखी वाढतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन पशुपालकांसाठी गाई, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी जनावरे खरेदी करण्यासाठी तसेच त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी अनेक योजना राबवते आणि अनुदान देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना किंवा शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. या लेखात आपण कडबा कुट्टी मशीन योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

“कडबा कुट्टी मशीन योजना २०२४” (Kadba Kutti Machine Yojana) चा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा, या योजनेची संपूर्ण माहिती, आणि कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी लाभार्थ्याला किती अनुदान मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ Kadba Kutti Machine Anudan Yojana. 

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, आणि त्यात दुग्ध व्यवसाय विशेषतः प्रचलित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गाई, म्हशी, शेळ्या, आणि मेंढ्या यांसारख्या जनावरांपासून मिळणारे खत शेतीसाठी खूप फायदेशीर असते. या खतातून पिकांची योग्य वाढ होते आणि उत्पादनही अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसायही करतात.

दुग्ध व्यवसाय करताना पशूंची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जर पशूंना योग्य प्रमाणात चारा (Kadba Kutti Machine Anudan Yojana) मिळाला नाही तर त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते. म्हणूनच, जनावरांना योग्य चारा देणे गरजेचे आहे. पशूंच्या चाऱ्याचे योग्य नियोजन केले तर पशुपालकांना त्याचा निश्चितच फायदा होईल.

योजेनेचे नाव कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना

(Kadba Kutti Machine Anudan Yojana)

अभियान कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
मिळणारा लाभ कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी अनुदान
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज कुठे करायचा MahaDBT Farmer Portal

कडबा कुट्टी मशीन फायदे. 

  • कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडल्यामुळे चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो
  • खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
  • चारा बारीक केल्याने जनावरांना खाणे सोपे जाते,
  • चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
  • चाऱ्याची  नासाडीही कमी होते.

Kadba Kutti Machine Yojana 2024 Apply Online Maharashtra. 

कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी शासन लाभार्थ्याला २०,००० रुपयेपर्यंत अनुदान देते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. लाभ मिळवण्यासाठी, लाभार्थ्याच्या नावे ७/१२ वर शेतजमीन असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर, लाभार्थ्याची निवड झाल्यास त्यास एसएमएसद्वारे सूचित केले जाते. तसेच, शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून देखील निवड झालेली आहे की नाही हे तपासू शकतात.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२ उतारा, ८ अ उतारा
  • मोबाईल नंबर. 
  • उत्पन्न दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पशु विमा

अर्ज करण्यासाठी “कडबा कुट्टी मशीन योजना” अंतर्गत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर, कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, जीएसटी बिल, बँक स्टेटमेंट आणि इतर संबंधित कागदपत्रे आवश्यक असतील. निवड झाल्यानंतर, पूर्वसंमती पत्र मिळाल्याशिवाय कडबा कुट्टी मशीन खरेदी करू नये. पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतरच कडबा कुट्टी मशीन खरेदी करावे.

कडबा कुट्टी मशीन साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login) वर नोंदणी/रजिस्ट्रेशन करावे लागेल. महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्जदाराच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. नंतर, आवश्यक माहिती आणि प्रोफाईल माहिती भरावी लागेल.

अर्ज करण्यासाठी, “अर्ज करा” या बटणावर क्लिक करा आणि “कृषी यांत्रिकीकरण समोरील बाबी निवडा” या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर खालीलप्रमाणे पर्याय निवडा:

  • मुख्य घटक: कृषी यंत्र औजारांसाठी खरेदीसाठी अर्थ सहाय्य
  • तपशील: Tractor/पॉवर टिलर चलित योजना
  • एच पी श्रेणी निवडा: २० बीएचपी पेक्षा कमी
  • यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे: फॉरेज/ग्रास/रेसेद्यू
  • मशीनचा प्रकार: कडबा कुट्टी (इंजिन/इलेक्ट्रिक ३ बीएचपी पेक्षा/पॉवर टिलर)

वरील प्रमाणे पर्याय निवडून, अटींच्या समोरील चौकोनात क्लिक करा आणि “जतन करा” बटणावर क्लिक करा. मुख्य पृष्ठ उघडा, पुन्हा “अर्ज करा” या बटणावर क्लिक करा, आणि “अर्ज सादर करा” या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जाचा प्राधान्य क्रम निवडा आणि “अर्ज सादर करा” वर क्लिक करून अर्जाचे शुल्क भरा.

अर्जाचे शुल्क भरल्यानंतर, तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होईल. या प्रकारे, तुम्ही Kadba Kutti Machine Anudan Yojana कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Chaff Cutter Subsidy in Maharashtra Apply Online. 

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी कोणतेही शेतकरी अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे. “Kadba Kutti Machine Anudan Yojana 2024” अंतर्गत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना कडबा कुट्टी मशीनसाठी ५०% अनुदान दिले जाते, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४०% अनुदान दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत, जास्तीत जास्त २० हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.

कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज करण्यासाठी, महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

योजनेचे स्वरूप लॉटरी पद्धतीचे आहे, ज्यामध्ये अर्जदारांची निवड लॉटरीद्वारे केली जाते. एकदा निवड झाल्यानंतर, अर्जदाराला संदेशाद्वारे माहिती दिली जाते.

Kadba Kutti Machine Anudan Yojana

Kadba Kutti Machine Anudan Yojana 2024 FAQs.

१. कडबा कुट्टी मशीन Kadba Kutti Machine Anudan Yojana अनुदान योजना काय आहे?
उत्तर: कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना २०२४ (Kadba Kutti Machine Anudan Yojana) ही एक सरकारी योजना आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी २०,००० रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. याचा उद्देश शेतकऱ्यांच्या कामातील कष्ट कमी करणे आणि त्यांच्या पशुपालन व्यवसायास मदत करणे आहे.

२. Kadba Kutti Machine Anudan Yojana या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे?
उत्तर: अर्जदाराच्या नावे ७/१२ उतारा असावा लागतो. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५०% अनुदान मिळते, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४०% अनुदान दिले जाते. अर्जदाराचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा लागतो.

३. कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी किती अनुदान मिळवता येते?
उत्तर: कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी जास्तीत जास्त २०,०००  रुपये पर्यंत अनुदान मिळवता येते. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५०% आणि अन्य लाभार्थ्यांना ४०% अनुदान दिले जाते.

४. कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर, “कृषी यांत्रिकीकरण” पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी आणि अर्ज सादर करावा.

५. कडबा कुट्टी मशीनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
उत्तर: कडबा कुट्टी मशीनसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा, ८ अ उतारा, मोबाईल नंबर, उत्पन्न दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, आणि पशु विमा यांचा समावेश आहे.

६. Kadba Kutti Machine Anudan Yojana योजनेसाठी अर्ज केल्यानंतर कधीपर्यंत निवड होते आणि कसे सूचित केले जाते?
उत्तर: अर्ज दाखल केल्यानंतर निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. निवड झाल्यावर अर्जदाराला एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. निवड झाल्यावर पूर्वसंमती पत्र मिळविल्यावरच कडबा कुट्टी मशीन खरेदी करणे आवश्यक आहे.

Kadba Kutti Machine Anudan Yojana. 

ही माहिती देखील बघा.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने मार्फत हे ४० व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज! असा घ्या फायदा

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment