What is Employee Gratuity | ग्रॅच्युटी म्हणजे काय ?

What is Employee Gratuity. 

नमस्कार,राम राम, मित्रांनो आज मी खास तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.ही माहिती आपल्या सर्वाना माहीत असणे गरजेचे आहे. आत्ता तुम्ही विचार करत असला कि कसली एवढी महत्वाची माहिती असेल बार ?

तुमच्या आमच्या मनात किंवा साधारण जनतेच्या मनात कधीतरी हा एक प्रश्न नक्कीच पडला असेल की What is Employee Gratuity ? ग्रॅच्युटी म्हणजे काय ?   ती कर्मचाऱ्यांना केव्हा,किती व कशी मिळते रक्कम ? ही सर्व तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे या लेखात मांडण्यात आले आहे. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी त्यासाठी लेख संपूर्ण वाचा ! चला तर मग सुरु करूया.. 

ग्रॅच्युटी म्हणजे काय ? कर्मचाऱ्यांना केव्हा,किती व कशी मिळते रक्कम ? पहा सविस्तर.

What is Employee Gratuity : ग्रॅच्युइटी म्हणजे एखाद्या संस्थेचे कर्मचारी पाच किंवा त्याहून अधिक वर्षांनी कंपनी सोडल्यावर बक्षीस म्हणून मिळणारी रक्कम म्हणजे ग्रॅच्युटी होय.ही रक्कम सामान्यतः कामगाराला निवृत्त होताना मदत करते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कामगारांचा अकाली मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास किंवा आरोग्य समस्यांमुळे निवृत्त होण्याची इच्छा असल्यास ही रक्कम दिली जाते. NPS धारक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अलीकडेच ग्रॅच्युइटी आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे.

ग्रॅज्युएटी म्हणजे काय ? What is Employee Gratuity ? 

ग्रॅच्युइटी हा सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारा पूर्व-परिभाषित लाभ आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर त्याला विहित सूत्राद्वारे ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाते. एखाद्या संस्थेत सतत ५ वर्षे काम केले तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. बर्‍याच वेळा निवृत्तीनंतर त्याची पूर्तता केली जाते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत ही रक्कम आधीच दिली जाते.

ग्रॅज्युएटी फायदा देणाऱ्या सरकारी संस्था आणि निम-सरकारी संस्था.

पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, १९७२ नुसार, दहा पेक्षा जास्त कामगार काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेमध्ये हा लाभ कर्मच्याऱ्याला मिळवता येतो. जर कर्मचारी नोकरी बदलतो किंवा सोडतो, निवृत्त होतो त्या वेळी ग्रॅज्युएटीचे नियम पूर्ण पूर्ण केले असतील, तर त्याला ग्रॅज्युएटीचा संपूर्ण लाभ मिळतो.

ग्रॅच्युइटी कधी मिळते?

पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा १९७२ नुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत चार वर्षे, १० महिने आणि ११ दिवस सतत काम केले आणि नंतर नोकरी सोडली, तर तो ग्रॅच्युइटीच्या रकमेचा हक्कदार आहे.

थोडक्यात, ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कर्मचार्‍यांच्या पगारातून कापला जातो, परंतु मोठा भाग कंपनीस्वतःकडून देते. सध्याच्या नियमांनुसार जर तुम्ही एखाद्या कंपनीत किमान ५ वर्षे काम केले असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. म्हणजेच तुम्ही पाच वर्षांनी कंपनी सोडल्यास तुम्हाला ग्रॅच्युइटी दिली जाईल.What is Employee Gratuity. 

गणना कशी होते?

ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी एक सूत्र आहे – (शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (१५ /२६). शेवटचा पगार हा तुमच्या शेवटच्या १० महिन्यांच्या पगाराची सरासरी आहे. या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता आणि कमिशन यांचा समावेश होतो.

महिन्यातील ०४ रविवार साप्ताहिक सुटी असल्याने २६ दिवस मोजले जातात आणि १५ दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.

उदा:

तुमचा पगार ६०,००० रुपये असेल आणि तुम्ही १० वर्षांच्या सेवेसह, तुमची ग्रॅच्युइटी किती असेल ?

जर तुमचा पगार ६०,००० रुपये असेल आणि तुम्ही १० वर्षे नोकरी करत असाल तर ग्रॅच्युइटी किती असेल? सूत्रानुसार, त्याची गणना – (६०,०००) x (१०) x (१५/२६) = रु. ३,४६,१५३ अशी केली जाईल. सूत्रानुसार ही रक्कम तुम्हाला कंपनीकडून ग्रॅच्युइटी म्हणून दिली जाईल. जर एखाद्या व्यक्तीचा पगार ६०,००० रुपये असेल परंतु त्याने फक्त ०५ वर्षे काम केले असेल तर त्याला किती ग्रॅच्युइटी मिळेल? अशा परिस्थितीत, सूत्रानुसार, गणना – (६०,०००) x (५) x (१५/२६) = रु. १,७३,०७६ रुपये ग्रॅच्युइटी म्हणून दिली जाईल. नियमांनुसार ग्रॅच्युइटी २० लाख रुपयांपेक्षा जास्त देता येत नाही.What is Employee Gratuity. 

ग्रॅच्युइटी भेटणाऱ्या पेमेंटसाठी पात्रता निकष.

पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, १९७२ च्या कलम ४ (१) अंतर्गत, तुमच्या नियोक्त्याकडून ग्रॅच्युइटीचा दावा करण्यासाठी खालीलपैकी एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • ५ वर्षांच्या सेवेनंतर तुम्ही नोकरी सोडल्यास. 
  • सेवानिवृत्त होण्याच्या बाबतीत. 
  • आजारपणामुळे किंवा अपघातामुळे तुम्ही अपंग झाल्यास. 
  • कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास.What is Employee Gratuity. 
  • सेवानिवृत्ती म्हणजे ज्या वयात कर्मचार्‍याने करारात किंवा सेवेच्या अटींमध्ये निश्चित केल्यानुसार नोकरी सोडली.
  • एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला ग्रॅच्युइटी दिली जाते.
  • कोणीही नामनिर्देशित न केल्यास, उपदानाची रक्कम मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना दिली जाईल.

ग्रॅच्युइटीवर आयकर भरावा लागतो का ?

भारताच्या आयकर कायद्यानुसार, ग्रॅच्युइटी पगार मानली जाते आणि ‘पगारातून मिळकत’ अंतर्गत कर आकारला जातो. एखाद्या कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला त्याच्या मृत्यूनंतर ग्रॅच्युइटी दिली असल्यास, ग्रॅच्युइटीची रक्कम ‘इतर स्त्रोतांकडून मिळकत’ उत्पन्न’ अंतर्गत दिली जाते. आयटी कायद्याच्या कलम १० (१०) अंतर्गत देय असलेली किमान ग्रॅच्युइटी करपात्र आहे. कर्मचार्‍याला मिळालेले किमान उत्पन्न करमुक्त २० लाख रुपये एवढे आहे.

FAQs. 

१. What is Employee Gratuity ग्रॅच्युटी म्हणजे काय?
उत्तर- ग्रॅच्युटी म्हणजे एखाद्या संस्थेचे कर्मचारी पाच किंवा त्याहून अधिक वर्षांनी कंपनी सोडल्यावर बक्षीस म्हणून मिळणारी रक्कम.

२. ग्रॅच्युटी कधी मिळते?
उत्तर- जर एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत चार वर्षे, १० महिने आणि ११ दिवस सतत काम केले, तर तो ग्रॅच्युटीच्या रकमेचा हक्कदार आहे.

३. ग्रॅच्युटीची गणना कशी केली जाते?
उत्तर- ग्रॅच्युटीची गणना करण्यासाठी सूत्र आहे: (शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (१५/२६).

४. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर ग्रॅच्युटी कोणाला मिळते?
उत्तर- कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसांना ग्रॅच्युटी दिली जाते.

५. What is Employee Gratuity.ग्रॅच्युटीची जास्तीत जास्त रक्कम किती आहे?
उत्तर- ग्रॅच्युटीची जास्तीत जास्त रक्कम २० लाख रुपये आहे.

What is Employee Gratuity
            What is Employee Gratuity.

👇ही माहिती देखील बघा👇

विधिमंडळांच्या आमदारांना दर महिन्याला पगार किती मिळतो ?

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment