Redmi चा 108MP कॅमेरा आणि 5030mAh बॅटरी असलेला बजेट फ्रेंडली फोन लॉन्च, किंमत खूपच कमी..

Redmi ने आज, 9 जुलै 2024 रोजी, आपल्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त Redmi मालिकेचा नवीन परवडणारा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Redmi 13 5G हा Redmi 12 5G चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. 

Redmi 13 5G मध्ये 6.79-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आहे ज्यामध्ये 90Hz ते 120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण आहे. 

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 AE (Accelerated Edition) चिपसेट आहे,  

फोनमध्ये 108 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा आहे, जो 3x सेन्सर झूमसह येतो. याशिवाय 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.  

फोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्टसह 5030mAh बॅटरी आहे. तसेच 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 

या फोनमध्ये ड्युअल 5G सिम सपोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, आणि USB टाइप-सी पोर्टचा पर्याय आहे. 

हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: हवाईयन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि ऑर्किड पिंक. 

Redmi 13 5G च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते. तर 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 

या डिव्हाइसची पहिली विक्री 12 जुलै रोजी दुपारी 12 वाजता mi.com, Amazon आणि Xiaomi रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.  

Tilted Brush Stroke

मोबाईलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा..