Vasantrao Naik Loan Yojana.
Vasantrao Naik Loan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या आजू बाजूला अनेक सुशिक्षित लोक आहेत, पण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत, म्हणून काही लोक व्यवसाय करण्याचे धाडस करतात; पण त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत. व्यवसायासाठी पैसे कुठून आणायचे? किंवा कर्ज घेतल्यास व्याज कसे भरायचे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात आणि त्यामुळे अनेक लोक बेरोजगार होतात.
वसंतराव नाईक थेट कर्ज योजनेंतर्गत, लाभार्थ्याला उद्योग सुरू करण्यासाठी ०१ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच,राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इत्यादी लाभार्थ्यांना तात्काळ लाभ दिला जातो.तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना कोणतेही व्याज आकारले जात नाही. या योजनेंतर्गत शासनाचा सहभाग १००% आहे. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येते.
१ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज – Maharashtra Government Business Loan Scheme.
सुशिक्षित बेरोजगार आणि गरजू व्यक्तींना राज्य सरकारच्या थेट कर्ज योजनेअंतर्गत (VJNT) व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; चला तर मग जाणून घेऊया हे बिनव्याजी कर्ज नेमके कोणाला मिळू शकते, या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, पात्रता काय आहेत, अर्ज कसा करावा?
वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत पुढील व्यवसाय सुरू करू शकता:
खालील ४० व्यवसाय सुरु करण्यासाठी वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज.
- मत्स्य व्यवसाय,
- कृषी क्लिनिक,
- पॉवर टिलर,
- हार्डवेअर शॉप,
- पेंट शॉप
- सायबर कॅफे,
- संगणक प्रशिक्षण,
- झेरॉक्स,
- स्टेशनरी,
- सलुन,
- ब्युटी पार्लर,
- मसाला उद्योग,
- पापड उद्योग,
- मसाला मिर्ची कांडप उद्योग,
- वडापाव विक्री केंद्र,
- भाजी विक्री केंद्र,
- ऑटोरिक्षा,
- चहा विक्री केंद्र,
- सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र,
- डी. टी. पी. वर्क,
- स्विट मार्ट,
- ड्राय क्लिनिंग सेंटर,
- हॉटेल,
- टायपिंग इन्स्टीट्युट,
- ऑटो रिपेअरींग वर्कशॉप,
- मोबाईल रिपेअरिंग,
- गॅरेज,
- फ्रिज दुरूस्ती,
- ए. सी. दुरुस्ती,
- चिकन शॉप,
- मटन शॉप,
- इलेक्ट्रिकल शॉप,
- आईस्क्रिम पार्लर
- मासळी विक्री,
- भाजीपाला विक्री,
- फळ विक्री,
- किराणा दुकान,
- आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान,
- टेलिफोन बुथ,
- अन्य तांत्रिक लघु उद्योग.
Vasantrao Naik Loan Yojana 2024 वसंतराव नाईक कर्ज योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशिल.
- उत्पन्नाचा दाखला (अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.)
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला
- शपथपत्र
Vasantrao Naik Loan Yojana 2024 या योजनेअंतर्गत दिले जाणारे प्राधान्य:
१. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरूण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.
२. निराधार, विधवा महिला इ. लाभार्थींना तात्काळ प्राधान्य.
Vasantrao Naik Loan Yojana 2024 कर्ज वितरण हप्त्याचे स्वरूप.
कर्ज योजनांसाठी योग्य लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर आणि मंजुरी मिळाल्यास आवश्यक वैधानिक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, कर्ज वाटपाच्या हप्त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
१. पहिला हप्ता (७५%) म्हणजेच ७५ हजार रुपये या कर्ज योजनेअंतर्गत मिळालेल्या १ लाखापैकी दिले जातील.
२. उर्वरित २५% रक्कम जिल्हा व्यवस्थापकांच्या निरीक्षण अभिप्रायानुसार वास्तविक (लघु-उद्योग) व्यवसाय सुरू केल्यानंतर सुमारे ३ महिन्यांनंतर रु.२५ हजाराचा दुसरा हप्ता उपलब्ध करून दिला जाईल.
प्रकल्प | रु.१,००,०००/- पर्यंत |
महामंडळाचा सहभाग (१००%) | रू. १,००,०००/- |
व्याजदर | नियमित कर्ज परतफेड करणा-या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. |
कर्ज परतफेडीचा कालावधी व कर्जाची परतफेड नियमित न करणा-या लाभार्थ्यांच्या बाबतीत दंडनिय व्याजदर | १. नियमित ४८ समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रू. २,०८५/- परतफेड करावी लागेल.२. नियमित कर्जाची परतफेड न करणा-या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील, त्या रक्कमेवर द.सा.द.शे. ४ % व्याज आकारण्यात येईल. |
पहिला हप्ता (७५ %) | रू. ७५,०००/ |
दुसरा हप्ता (२५%) (प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर) | रू. २५,०००/ ( जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार ) |
- १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
- VJNT पोर्टल ओपन केल्यानंतर “नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे अर्ज तपशीलासाठी आवश्यक सर्व माहिती भरा आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करून आपण ऑनलाईन अर्ज भरू शकता.Vasantrao Naik Loan Yojana
- तसेच ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्हा कार्यालयामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये जाऊन वसंतराव नाईक कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जामधील माहिती योग्य रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि तो अर्ज कार्यालयामध्ये जमा करावा.
वसंतराव नाईक वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या अटी व शर्ती :
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
अर्जदाराची अर्हता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
- लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ५० दरम्यान असावे. Vasantrao Naik Loan Yojana.
- अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा.
- कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:
- शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- बँक स्टेटमेंट
- प्रकल्प अहवाल
वसंतराव नाईक गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अटी व शर्ती.
अर्जदाराची अर्हता:
गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत.
- गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील
- गटातील लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ४५ दरम्यान असावे
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:
- शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- बँक स्टेटमेंट
- प्रकल्प अहवाल
वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत – VJNT Loan Scheme Application Form.
ऑनलाइन अर्ज भरा:Apply Online Application
वसंतराव नाईक कर्ज योजना कर्ज वसुली कार्यपध्दती.
- कर्जाची परतफेड ही कर्ज वितरीत केल्याच्या ९० दिवसांनंतर सुरू करण्यात येईल.
- कर्ज परताव्याचे मासिक हप्ते ठरवून द्यावेत व कर्ज वसुलीच्या दृष्टीने लाभार्थ्यांकडून पुढील दिनांकांचे आगाऊ धनादेश घेऊन तसेच ECS (इलेक्टॉनिक क्लिअरन्स सिस्टम) पध्दतीने वसुली करण्यात येईल.Vasantrao Naik Loan Yojana
- एवढे करूनही वसुली न झाल्यास महामंडळाकडे ठेवलेल्या तारण तसेच जामीनदारांद्वारे कर्ज वसुली करण्यात यावी. जामीनदाराकडून कर्ज वसुली शक्य न झाल्यास जमीन महसूल संहितेच्या कलम २२१ अंतर्गत (आर. आर. सी.) नुसार जिल्हाधिकारी यांना याबाबत संपूर्ण माहिती सादर करून कर्ज वसुली करण्यात येईल.
Vasantrao Naik Loan Yojana 2024 FAQs.
१. वसंतराव नाईक Vasantrao Naik Loan Yojana कर्ज योजना २०२४ काय आहे?
उत्तर: वसंतराव नाईक कर्ज योजना २०२४ ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, ज्याअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.
२. वसंतराव नाईक कर्ज योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे?
उत्तर: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा, त्याचे वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे, आणि अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
३. वसंतराव नाईक Vasantrao Naik Loan Yojana कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
उत्तर: वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, पत्त्याचा पुरावा, बँक स्टेटमेंट, आणि प्रकल्प अहवाल यांचा समावेश आहे.
४.Vasantrao Naik Loan Yojana या योजने अंतर्गत कोणते व्यवसाय सुरू करता येऊ शकतात?
उत्तर: वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत ४० विविध व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. यामध्ये मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, सायबर कॅफे, झेरॉक्स शॉप, ऑटोरिक्षा, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, हॉटेल, चिकन शॉप, मासळी विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, इत्यादींचा समावेश आहे.
५. वसंतराव नाईक Vasantrao Naik Loan Yojana कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्जासाठी VJNT पोर्टलवर जाऊन नोंदणी करा आणि आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा. ऑफलाइन अर्जासाठी जिल्हा कार्यालयात जाऊन अर्ज घ्या, त्यामधील माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करा.
६. वसंतराव नाईक कर्ज योजना २०२४ अंतर्गत कर्जाची परतफेड कशी करावी?
उत्तर: वसंतराव नाईक कर्ज योजना अंतर्गत कर्जाची परतफेड कर्ज वितरीत केल्याच्या ९० दिवसांनंतर सुरू केली जाते. कर्जाची परतफेड मासिक हप्त्यांमध्ये करावी लागते. नियमित परतफेड न केल्यास दंडात्मक व्याजदर आकारला जाऊ शकतो. परतफेड करण्यासाठी ECS (इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टम) पद्धतीचा वापर केला जातो.
Vasantrao Naik Loan Yojana.
ही माहिती देखील बघा.
पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र ,ऑनलाइन अर्ज,उद्देश,पात्रता,सबसिडी,कागदपत्रे,संपूर्ण माहिती
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥