Aapli Chawdi – Bhrashtachari Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint | सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,भ्रष्टाचार करत आसतील तर.अशी करा आनलाईन कंप्लेंट

Bhrashtachari Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint

नमस्कार,मित्रांनो आज आपण या लेखात तुमच्या गावाकडील  सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, भ्रष्टाचार करत आसतील तर त्यांच्या विरोधात अशी करा ऑनलाईन कंप्लेंट.तुमच्या गावात जर सरकारी कामे होत नसतील, किंवा सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील, तर त्याबद्दल कुठे तक्रार करायची याची सविस्तर माहिती आम्ही येथे देणार आहोत. gramsevak talathi online complaint in marathi या तक्रारीद्वारे सरकारी अधिकाऱ्यांना तुमच्या केलेल्या तक्रारींचे निवारण करावेच लागते,तसेच केलेल्या तक्रारीच्या अहवालाची प्रत तुम्हाला पाठवायची आहे. ही तक्रार यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली काम करते.

भ्रष्ट किंवा अकार्यक्षम सरपंच,ग्रामसेवक,तलाठी यांची ऑनलाइन तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पुढील प्रमाणे:

नागरिकांना मोबाईल फोन किंवा संगणकाद्वारे ऑनलाइन तक्रारी नोंदवता याव्यात या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. sarpanch gramsevak talathi online complaint in marathi ऑनलाइन तक्रार करण्यासाठी प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून “आपले सरकार” अँप इंस्टॉल करावे लागेल किंवा गुगल क्रोम वरून “आपले सरकार” ची खालील वेबसाइट उघडावी लागेल.

आपले सरकार वेबसाईट किंवा मोबाईल अँप.

खालील दिलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे आपले सरकार ही अधिकृत वेबसाईट ओपन करा किंवा आपले सरकार अँप ओपन करा. मी इथे तुम्हाला आपले सरकार ही अधिकृत वेबसाईट ओपन करून संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. चला तर मंग आपण वेबसाईट ओपन करूया सर्व प्रथम वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरती भाषा पर्यायामध्ये मराठी भाषा निवडा.Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

👉https://aaplesarkar.maharashtra.gov.in

पुढे तक्रार निवारण, सेवा हक्क कायदा ,तक्रार निवारण ,माहितीचा अधिकार, माझे सरकार, असे ४ पर्याय दिसतील त्यापैकी तुम्हाला “तक्रार निवारण’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint

 

 bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi
                                                         bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

 

खालील तक्रार निवारण या पर्यायावर क्लिक करा.

bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

तक्रार निवारण पर्यायावर क्लिक केल्यानंतर, महाराष्ट्र शासनाची तक्रार निवारण प्रणाली तुमच्या समोर ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला “तक्रार दाखल करा” पर्यायावर क्लिक करायचे आहे.

bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi
                                            “तक्रार दाखल करा” 

 

नागरिक लॉगिन.

आता नागरिकांच्या लॉगिनमध्ये मोबाइल नंबर आणि ई-मेल टाइप करून Verify (पडताळणी) करा आणि तक्रार निवारण प्रणालीमध्ये लॉग-इन करा. कृपया तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/ई-मेल आयडीवर प्राप्त झालेला वन टाइम पासवर्ड ओटीपी (OTP) प्रविष्ट करा.Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint

bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

तक्रार दाखल करा.

नावाची नोंद ठिकाणी: इथे तुमचे नाव लिहा.

प्रशासन स्तर: गावातील शासकीय तक्रारींचे वेळेवर आणि त्वरीत निवारणासाठी ग्रामपंचायतीच्या संबंधित तक्रारींसाठी प्रशासन स्तरावरील “जिल्हा” ह्या पर्यायावर क्लिक करा. पुढे जिल्हा आणि तालुका निवडा आणि प्रशासनाच्या प्रकारात “जिल्हा परिषद” निवडा.

bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

दाखल करणाऱ्या तक्रारीचे स्वरूप.

तक्रार स्वरुपमध्ये, गावातील विविध सरकारी काम आणि योजनांशी संबंधित तक्रारींसाठी, खालील विविध तक्रार स्वरुप पहा किंवा इतर कोणताही ग्रामपंचायत संबंधित तक्रार स्वरूप निवडा.gramsevak talathi online complaint in marathi

  • १) ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना.
  • २) ग्रामपंचायत प्रशासन संबधित बाबी.
  • ३) जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता/वाढीने वर्गाना मान्यता.
  • ४) शालेय पोषण आहार बाबत.
  • ५) कुपोषित मुला-मुलींसाठी अतिरिक्त आहार.
  • ६) माध्यमिक शाळाविषयी इतर बाबी.
  • ७) प्राथमिक शाळागृहांची/ शौचालय दुरुस्ती.
  • ८) पाळणाघर चालविणे.
  • ९) अंगणवाडी इमारत / शोचालय बांधकाम.
  • १०) प्राथमिक शाळाविषयी इतर बाबी.
  • ११) अंगणवाडी केंद्रातील मुला मुलींसाठी गणवेश पुरविणे
  • १२) प्राथमिक उपचार प्रतिबंधात्मक सेवा
  • १३) जि.प.शाळेतील इ.५ वी ते ७ वी तील मुलींना सायकल पुरविणे
  • १४) रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण कार्य
  • १५) प्रजनन व बाल आरोग्य सेवा.Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint.
  • १६) विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
  • १७) शालेय आरोग्य तपासणी/अंगणवाडी तपासणी.
  • १८) मदत गट
  • १९) आरोग्य व आहार विषयक शिक्षण
  • २०) इंदिरा आवास योजना
  • २१) दारिद्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविने
  • २२) पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम
  • २३) पाणीपुरवठा योजनेंतर्गत अस्तीत्वातील विहीरींचे रुंदीकरण व खोलीकरण/दुरुस्ती
  • २४) नविन पाणी पुरवठा योजना
  • २५) कृषी संबधी
  • २६)विंधन विहीर (हातपंप)
  • २७) ग्रामीण रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व दुरुस्ती
  • २८) स्मशानभुमी / अंगणवाडी इमारत बांधकामे
  • २९) अभिकरण (वि.प.स./ वि. स. स./ डोंगरी/ खासदार निधी)
  • ३०) तिर्थक्षेत्र / पर्यटन विकास कार्यक्रम
  • ३१) १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे
  • ३२) जवाहर विहिरी.Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint.
  • ३३) अपंगांना शाळा, मागास विद्यार्थीींना शिष्यवृत्या, अनुदानित वसतिगृहे इ
  • ३४) जनावरांना उपचार, लसीकरण कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया इ.
  • ३५) दलितवस्ती सुधार योजना
  • ३६) ग्रामीण भागातील बेरोजगार मुलीं व महिलां साठीच्या योजना
  • ३७) जिल्हा परिषद मालकीच्या इमारतींचे देखभाल व दुरुस्ती
  • ३८) महिलां साठी समुपदेशन केंद्र चालविणे
  • ३९) महिलांना कायदेशीर / विधी विषयक सल्ला देणे
  • ४०) विविध कामांच्या देयकांची रक्कम संबधितांना अदा करणे
  • ४१) मुलींना स्वसंरक्षणा साठी व त्यांच्या शारीरिक विकासा साठी प्रशिक्षण योजना
  • ४२) कर्मचारी नेमणूका, पदोन्नती, जिल्हा बदल्या/नियतकालिक बदल्या इ.
  • ४३) इतर…

तुमची तक्रार.

या पर्यायामध्ये तुमचे नाव, ग्रामपंचायत गावाचे नाव लिहून, Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint वरील पैकी कोणत्याही एका तक्रारीच्या स्वरूपा नुसार कमीत कमी २००० शब्दामध्ये तक्रार दाखल करा.

bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

प्रतिमा अपलोड करा.

प्रतिमा (इमेज) अपलोड करा या पर्यायामध्ये तुम्ही पुरावा म्हणून तक्रारीची प्रतिमा (फोटो) अपलोड करू शकता (फाईल्स 2 MB पेक्षा कमी असाव्यात. स्वीकृत फाइल प्रकार हा: png jpg jpeg.).

दस्तऐवज अपलोड करा.

या पर्यायामध्ये तुम्ही पुरावा म्हणून तक्रारीची PDF फाइल अपलोड करू शकता (फाइल 2 MB पेक्षा कमी असावी ● स्वीकृत फाइल प्रकार: PDF.).

प्रतिमेतील कोड एंटर करा (केस सेन्सिटिव्ह).

या पर्यायात वर दिलेल्या इमेजमधून कोड एंटर करा.

पुढे तुम्ही करत असलेल्या तक्रारीचे पूर्वावलोकन पाहण्यासाठी  ‘ Preview वर क्लिक करा आणि कृपया योग्य “प्रशासन पातळी”, “प्रशासन प्रकार” आणि “तक्रारीचे स्वरूप” निवडले नसल्यास कृपया दुरुस्त (Edit) करा.Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint

Confirm & Submit.

“पूर्वावलोकन” “Preview” मध्ये तुमची तक्रार योग्य दिसत असल्यास तक्रारीची पुष्टी करण्यासाठी “Confirm & Submit” वर क्लिक करा.

bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

तक्रार सबमिट झाल्यावर तुमची तक्रार SAVE झाल्याचा आपल्याला एक टोकन मॅसेज तुमच्या मोबाईल वर येतो.

तक्रारीची स्थिती.

आपण केलेल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून तक्रार यादीतून तक्रार निवडा किंवा आपल्या मोबाईल वर आलेला टोकन नंबर नोंदवा.

प्रलंबित तक्रारींबाबत संपर्क क्रमांक.

तुमच्या केलेल्या तक्रारीचे २१ दिवसांत निवारण न झाल्यास, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६ दिनांक २४ ऑगस्ट २०१६ भाग-ब. अनु. क्र. ६ नुसार तुम्ही संबंधित नोडल अधिकाऱ्यांना विचारू शकता, संपर्क क्रमांकासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://grievances.maharashtra.gov.in/mr/officers-contact

तक्रार दाखल करताना तांत्रिक सहाय्य हेल्पलाईन नंबर.

तुम्हाला तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास कॉलसेंटर/ हेल्पलाईनवर संपर्क साधा: १८००१२०८०४०/18001208040

Bhrashtachari Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint
Bhrashtachari Sarpanch Gramsevak Talathi Online Complaint

👇हे देखील वाचा 👇

एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो.(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment