Aapali Chawdi – PM Kisan Mini Tractor Yojana 2024 | मिनी ट्रॅक्टर योजना राज्य सरकारकडून ९०% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू

PM Kisan Mini Tractor Yojana In Maharashtra Online Application Starts

PM Kisan Mini Tractor Yojana: नमस्कार मित्रांनो आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकार अनेक योजना राबवते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाते.आज या लेखात आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री किसान मिनी ट्रॅक्टर योजनेची माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.

ट्रॅक्टर अनुदान योजनेत ९०% अनुदान उपलब्ध आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते निकष आवश्यक आहेत आणि या योजनेसाठी कोण कोणत्या लाभार्थ्याला अर्ज करीता येईल तर या योजनेंतर्गत मिळणाऱ्या ट्रॅक्टर आणि त्याची अवजारे यांचा कश्याप्रकारे घ्यायचा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करून सबसिडी मिळवू शकता. त्यासंबंधित सर्व माहिती या लेखात दिली आहे.

मिनी ट्रॅक्टर योजनेचे उद्दिष्ट.PM Kisan Mini Tractor Yojana

  • ही योजना राज्य सरकारची असून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध स्वयंसहायता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • त्यांच्या राहणीमानात बदल करण्याच्या उद्देशाने ही योजना सरकारी पत्र क्रमांक STS 2011 Pr. No. 439 / AJAC 1 दिनांक ६ डिसेंबर २०२३ पासून पुन्हा नव्याने लागू करण्यात आली आहे.
  • सदर योजने अंतर्गत ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने वाटप करण्यात येणार आहे.
  • ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या प्रवर्गासाठी लागू आहे.
  • १० टक्के रक्कम कुटुंबातील सदस्यांनी भरल्यास ९०% अनुदान दिले जाईल.
  • बचत गटांना उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
  • अनुसूचित जाती-जमाती सारख्या लोकांना प्रगत करणे.

PM Kisan Mini Tractor Yojana प्रमुख अटी आणि योजनेची पात्रता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजनेमध्ये काही अटी देखील आहेत आणि फक्त पात्र अर्जदारच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी अर्जदारांनी प्रथम पात्रता आणि निकष तपासणे आवश्यक आहे. यासाठी खाली दिलेल्या अटी जाणून घ्या.

  • प्रधानमंत्री मिनी ट्रॅक्टर योजने अंतर्गत लाभार्थी हा फक्त १ ट्रॅक्टर विकत घेऊ शकतो.
  • या योजनेसाठी अर्ज करणार नागरिक हा महाराष्ट्राचा कायमचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सदर अर्जदाराची वयोमार्यादा १८ ते ६० वर्षे असावी.
  • अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे १.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असावे.
  • योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • सदर उमेदवार हा ८०% गट हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जाती तसेच नव-बौद्ध गटातील असावा.
  • ज्या अर्जदारांनी योजनेसाठी अर्ज केला आहे त्याच्या नावाचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने कमाल खरेदी मर्यादा ३.५ लाख रुपये राहील.
  • स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल रकमेच्या १०% हिस्सा भरल्यानंतर ९०% म्हणजे कमाल ३,१५०००/- रुपये शासकीय अनुदान राहील.

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.

  • पासपोर्ट साइज आकाराचा फोटो.
  • पैन कार्ड.
  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
  • स्थानिक रहिवासी दाखला.
  • वार्षिक उत्पन्न दाखला.
  • जमिनीचा ७\१२ ,८ अ उतारा.
  • बँक खाते पासबुक.
  • मोबाईल नंबर.

PM Kisan Mini Tractor Yojana अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • या योजनेंतर्गत दिल्या गेलेल्या लाभाचे स्वरूप म्हणजे मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपसाधने.
  • लाभ घेण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा स्तरीय कार्यालयाकडे जाऊन अर्ज आणू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन अर्ज आणू शकता.
  • समाज कल्याण कार्यालयाकडे गेल्यानंतर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतर योजनेसाठी अर्ज करा.
  • त्यानंतर तेथून तुम्हाला प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा तेथे तुमची कागदपत्रे जमा करून तुम्ही फॉर्म भरू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला तेथून प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज घेऊन तेथे तुमची कागदपत्रे सबमिट करून तुम्ही फॉर्म भरू शकता.
  • त्यानंतर तुमचा फॉर्म तेथे असलेल्या केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून भरला जाईल ज्यासाठी तुम्हाला काही माहिती विचारली जाईल.
  • सर्व माहिती योग्य असल्यास तुमची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली जातील.
  • फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा फॉर्म क्रमांक असलेली पावती दिली जाईल.
  • अशा प्रकारे मिनी ट्रॅक्टर योजनेसाठीचा तुमचा अर्ज पूर्ण होईल आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.

सूचना: जर तुम्हाला वरील प्रोसेस किचकट वाटत असेल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन फॉर्म देखील भरू शकता.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा.(Click here)

👇ही योजना देखील बघा👇

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना २०२४ ऑनलाईन अर्ज सूरु.(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment