Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2024: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana.शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांसाठी मे २०२३ मध्ये नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. नमो शेतकरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये ६०००/- रुपयांचे वाटप केले जाईल. हे हफ्ते शेतकऱ्यांना  च्या आधी मिळतील.अशा पद्धतीने केंद्र सरकार ६०००/-रु. महाराष्ट्र सरकार तर्फे ६०००/-रु. शेतकऱ्यांना मिळणार आहे.

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, भारतातील अधिकाधिक शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे भारतात आतापर्यंत १७ हफ्ता वितरित करण्यात आले आहेत. नमो शेतकरी योजना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. जिथे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसोबत अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात.

नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा स्थायी निवासी असणे आवश्यक.
  • अर्ज दाराकडे स्वतःची शेती असणे आवश्यक.
  • अर्ज शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सदस्य असला पाहिजे.
  • अर्जदार शेतकरी उन्नत गटात मोडत नसला पाहिजे.
  • अर्जदार शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.

Namo Shetkari Yojana चे फायदे. 

  • नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६०००/- रुपयांच्या अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहे.
  • ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
  • महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे, ज्याने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.
  • याचा फायदा फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • एकाच वेळेस दोन योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • यातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल.
  • दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही योजनांची व संजीवनी म्हणूनच लाभली आहे असे म्हणावे लागेल

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते विवरण
  • जमिनीची कागदपत्रे
  • शेती तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयुक्त (कृषि) यांनी संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरुन, राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती आयुक्त (कृषि) यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यासाठी परवानगी देणेबाबत तसेच सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे सदर योजना राबविताना येणाऱ्या विविध अडचणी विचारात घेऊन सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीमधील मेकर, सहायक चेकर तसेच चेकरची भूमिका सोपविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास बाबतीत शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

 

शासन निर्णय:-

१) आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्र. गणना / नमो शेतकरी महासन्मान निधी नस्ती/१८११२/२०२३, दि.३१.०५.२०२३.

२) कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्रमांक: किसनि-२०२३/प्र.क्र.४२/११-ओ, दि.१५.०६.२०२३.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेस अनुसरुन, अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी रुपये ६,०००/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये ६,०००/- इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्र.३ येथील दि.१५.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्र सूचना आणि नियम विकसित करुन तसेच नवीन बचत बँक खाते उघडून सदर योजना सार्वजनिक आणि वित्तीय व्यवस्थापन या द्वारे राबविण्यात येणार आहे..

राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ( Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी ही एक  राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या संदर्भात प्रशासकीय खर्चासाठी १  अशी एकूण २ स्वतंत्र बचत खाती “बँक ऑफ महाराष्ट्र” या राष्ट्रीय कृत बँकेत खाते उघडण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे. 
सदर शासन निर्णय या विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि. २७.०९.२०१७ रोजीच्या शासन निर्णयामधील खालील नमुद अटी व शर्तींच्या अधीन राहून तसेच वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. १७८/२३ / कोषा प्रशा-५, दि. ११.०७.२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
१) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान वितरित करण्याकरिता आणि  राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या शाकीय खर्चाकरिता उघडण्यात येणाऱ्या बचत बँक खातेत्यांचा वापर केवळ त्याच काम करिता करण्यात यावा.
२) बचत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला निधी त्याचा व्याज तसेच योजनेच्या कामांच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीचा योग्य वेळो वेळी आढावा घेऊन त्याबाबतच अहवाल सादर करावे.
३) सदर बचत बँक खात्यावरील व्याजाची रक्कम आणि शिल्लक रक्कम याचा व्यवस्थित लेखा जोखा घेऊन निश्चित होणारी रक्कम ही शासकीय कार्यलयाच्या दैनंदिन लेख्यामध्ये जमा करावी.
४) सदर बँक खात्यात खूप काळ निधी बिनावापर पडून राहणार नाही या हिशोबणी तात्काळ नियोजनासाठी आवश्यक असेल त्याचवेळी कोषागारातून निधी आहरित करण्यात यावा.
५) नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाल्यास त्या योजनेचे बचत खाते बंद करण्यात यावे. सदरची जबाबदारी ही आयुक्त स्तरावर कृषि आयुक्त यांची असेल.
६) (१) सदर खात्यातील व्यवहार फक्त सार्वजनिक आणि वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे होणार असल्यामुळे ज्या ज्यावेळी ह निधी खर्च करावयाचा असेल त्या त्यावेळी सक्षम अधिकाऱ्याने बँकेच्या नावे निधी वितरणाचे आदेश (Fund Transfer Order)द्यावे. त्यासाठी सार्वजनिक आणि वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर लॉगईन करुन आलेला Fund Transfer Order तयार करण्यात यावी. सदर काम मेकरचे असेल. (२) सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे बचत खात्यातील व्यवहार करण्यासाठी कृषि आयुक्तालय,पुणे या कार्यालयातील उपायुक्त म्हणजेच(कृषि गणना) हे मेकर (Maker) असतील व सहाय्यक संचालक (लेखा-१) हे सहाय्यक चेकर (Assistant Checker) असतील तसेच आयुक्त (कृषि) हे अंतिम चेकर (Final Checker) म्हणून जबाबदार असतील.
७) उपरोक्त (२) प्रमाणे व्यवहार होत असल्याने, कोणत्याही परिस्थितीत चेकबुकचा वापर होणार नाही. त्यामुळे सदर खाते विना चेकबुकचे असल्याबाबत लेखी आदेश सर्व संबंधितांनी त्यांच्या स्तरावरुन बँकेस द्यावेत.
८) सदर खात्यातून रोख अथवा चेकबुक अथवा विड्रॉवल स्लिप (Withdrawal Slip) या मार्गाने व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात येत आहे.
९) आयुक्त (कृषि) स्तरावर आवश्यकतेनुसार विड्रॉवल (Withdrawal) ही सुविधा उपलब्ध असेल.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७२८१५४२३१६५०१ असा आहे. हा आदेश

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2024 FAQs.

१. नमो शेतकरी महासम्मान निधी योजने Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana अंतर्गत किती अनुदान दिली जाणार आहे ?
उत्तर: नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६०००/- रुपये अनुदान दिले जाणार आहे.

२. Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
उत्तर: जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधी योजनेचे सदस्य आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया करण्याची गरज नाही.

३. Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणत्या महिन्यात मिळेल ?
उत्तर: Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Installments Time हा एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च असा असणार आहे.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Apply Online
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Apply Online

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Apply Online

ही माहिती देखील बघा.

जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा?

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment