Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana.
Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana: सर्वांना नमस्कार, तुम्हाला लालपरीची एक अद्भुत योजना माहीत आहे का? या योजनेमुळं तुम्ही महाराष्ट्रात कुठेही प्रवास करू शकता. महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत असते. त्यामुळे प्रवाशांसाठी खास प्रवासासाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजना राबवण्यातआली आहे. Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana ही योजना १९८८ सालापासून पासून स्थापित केली गेली आहे. प्रवाशांशी स्नेह आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने, आणि प्रवाशांना कमी खर्चात पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे अशा विविध स्थळांना भेट देता यावी या हेतू खाली त्यांनी प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास हि योजना प्रस्थापित केली.
एस-टी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. लाल परीची फेरी गावोगावी फिरते. त्यामुळे गावी जाताना लहान पणी या लालपरीतून स्वारी निघायची. आपल्या सर्वांच्या हृदयात लालपरीची आठवण आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लालपरी हाल सोसते आहे. अनेकदा एसटीच्या तुटलेल्या खिडक्या, दरवाजे, फाटलेल्या सीटचे फोटो समोर येतात. मात्र, एसटी महामंडळ परिवहनकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एसटीला अधिक प्रवासी मिळावेत यासाठीही योजना राबवल्या जातात. त्यातील एक योजना म्हणजे ‘आवडेल तिथे प्रवास’.
आवडेल तेथे प्रवास योजना २०२४ काय आहे ही योजना ?
Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘आवडेल तिथे कुठेही प्रवास’ योजना १९८८ पासून सुरू असून, ही योजना प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महामंडळाला दरवर्षी १२ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सुरुवातीला या योजनेत १० दिवसांचा पास देण्यात येत होता. मात्र, २००६ पासून प्रवाशांच्या सुविधार्थ ४ दिवसांचा पासही देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, २ मे २०१० पासून १० दिवसांचे पास बंद करून त्याऐवजी ७ दिवसांचा पास देण्यात येत आहे.
सध्या जलद, रात्रराणी, आंतरराज्य, शहरी आणि यशवंती (मिडी) बस सेवेत ४ दिवसांच्या पाससाठी प्रौढांना १,१७० रुपये तर शिवशाही आंतरराज्य बससाठी १,५२० रुपये इतका शुल्क आकारला जातो. तर ७ दिवसांच्या पाससाठी अनुक्रमे २,०४० आणि ३,०३० रुपये आकारले जातात. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात या योजनेतून ८९,६३३ पासची विक्री झाली आहे आणि यातून महामंडळाला १ हजार २२६ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेची अधिकृत माहिती वाचून योजनेचा लाभ घेण्यासाठी
काय आहे प्रक्रिया ?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘आवडेल तिथे कुठेही प्रवास’ Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana ही योजना प्रवाशांच्या सोयीसाठी 1988 पासून सुरू आहे. या योजनेत 4 आणि 7 दिवसांचे पास देण्याची सुविधा आहे. या योजनेतील काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:
- आंतरराज्य प्रवासासाठी हा पास कुठेही वैध राहील. याशिवाय, महामंडळाच्या शहरी बस सेवांमध्येही हा पास वापरता येईल. उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीतही वापरता येईल.
- पासची मुदत संपल्यानंतर तो परत करता येणार नाही.
- आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल. पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana.
- साध्या सेवेचा पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह) वैध राहील.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “आवडेल तेथे कोठेही प्रवास” सन १९८८ पासून प्रवाशांसाठी राबवित आहे. या योजने अंतर्गत ७ दिवसाच्या पासाप्रमाणे ४ दिवसाचा पास दिला जातो.सुधारित दर दिनांक ०५.०१.२०२२ पासून लागू राहतील.
४ आणि ७ दिवसांकरिता पास खालील प्रमाणे तक्ता.
वाहतूक सेवेचा प्रकार | ७ दिवसाच्या पासाचे मुल्य | ४ दिवसाच्या पासाचे मुल्य | ||
प्रौढ | मुले | प्रौढ | मुले | |
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह | २०४० | १०२५ | ११७० | ५८५ |
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह | ३०३० | १५२० | १५२० | ७६५ |
(वर दर्शविलेले मुलांच्या पासाचे दर ५ वर्षापेक्षा जास्त व १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत.)
ह्या पास ची वैधता कधीपासून असेल ?
Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana – या योजने अंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल. ह्या चार दिवसाच्या पास ची वैधता हि पहिल्या दिवशी रात्रीचे बारा वाजल्यापासून ते चौथ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असेल असे सूचित करण्यात आले. ह्यामध्ये जर प्रवाशांना आंतरराज्यात प्रवास करायचा असेल किंवा महाराष्ट्रात प्रवास करायचा असेल ह्याची वैधता हि सारखीच असेल. ज्या प्रवाशांना हा पास बनवायचा असेल त्यांना जवळच्या बसस्थानकात ओळखपत्र बनवून पास बनवता येईल असे सांगितले गेले. स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.
या योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणे.
१. या योजने अंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातील.
२. साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.
३. निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी,निमआराम,विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठीआंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहील.
४. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल.
५.“आवडेल तेथे कोठेही प्रवास ” योजनेचे पास नियमीत बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये ग्राह्य राहील.
६. सदर पासावर प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठीते पासधारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये.
७. आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही,परंतु या योजनेतील पास धारकाना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल.
८. या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो व १२ वर्षाखालील मुलास १५ किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल.
९. पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल.
१०. पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही.वा हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
११. सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.
१२. प्रवासात वैयक्तीक वस्तु गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही.
१३. आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल.पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.
१४. काही वेळा रा.प.बसेस उशिरा सुटल्यामुळे,मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य कारणामुळे जी बस नियोजित पोहचण्याची वेळ २४.०० पूवी होती ती २४.०० नंतर पोहचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट आकार वसूल करू नये.
१५. राप/वाह/सामान्य-८८/८०७२ दिनांक ०२/११/१९९८ – वाहतूक खाते परिपत्रक क्र.३०/१९९८ अन्वये दिलेल्या सुचनांनुसार घरातील नातलगाचा मुत्यू,भुकंप,आग लागणे, आतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविले असल्यास प्रत्येक पासामागे रु.२०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रकमेचा त्यास परतावा देण्यात यावा.Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा,व त्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येऊ नये.
१६. संप / काम बंद आंदोलन यामुळे रा.प. वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल.सदरची मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्या पासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana.
१७. स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.
टीप :- योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) म्हणजेच ST डेपो मध्ये जाऊन पास काढून घ्या लागेल.
Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana FAQs.
१. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना काय आहे?
उत्तर: ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) योजना आहे, जी १९८८ पासून सुरू आहे. या योजनेत, प्रवाशांना ४ किंवा ७ दिवसांचे पास उपलब्ध करून दिले जातात, ज्याद्वारे महाराष्ट्रातील कुठेही प्रवास करता येतो.
२. Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana या योजनेत पास काढण्यासाठी किती शुल्क आहे?
उत्तर: ४ दिवसांच्या साध्या बससेवेच्या पाससाठी प्रौढांसाठी शुल्क ₹११७० आहे, तर ७ दिवसांच्या पाससाठी ₹२०४० आहे. शिवशाही बससेवेच्या पाससाठी ४ दिवसांचे शुल्क ₹१५२० आणि ७ दिवसांचे शुल्क ₹३०३० आहे.
३. Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana या योजनेतून मिळालेल्या पासचा उपयोग कोणत्या बसेसाठी केला जाऊ शकतो?
उत्तर: या योजनेतील साध्या बससेवेचा पास सर्व प्रकारच्या साध्या बसेसाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती, आंतरराज्य) वापरता येतो. शिवशाही बससेवेचा पास शिवशाही, साधी, निमआराम, आणि विनावातानुकूलित शयन आसनी बसेसाठी वापरता येतो.Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana.
४. पासची वैधता किती काळ असते?
उत्तर: पासची वैधता हा पासाच्या पहिल्या दिवशी रात्री १२ वाजल्यापासून ते शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत असते. योजनेत ४ आणि ७ दिवसांच्या पासाची सुविधा आहे.
५. Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana साठी पास हरविल्यास काय करावे?
उत्तर: पास हरविल्यास त्याची पुनर्प्राप्ती किंवा परतावा मिळत नाही. हरविलेला पास पुनः मिळवण्याची किंवा त्याबाबत कोणत्याही प्रकारची भरपाई दिली जात नाही.
Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana.
ही माहिती देखील बघा.
436 रुपये भरा आणि मिळवा 2,00,000 /- रुपये.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.