Maharashtra Lek Ladki Yojana 2024 Online Apply.
Maharashtra Lek Ladki Yojana : सर्वांना नमस्कार, सध्या राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेची चर्चा आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेचा सध्या राज्य सरकारकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे साहजिकच अनेक महिलांनी यासाठी अर्ज भरले आहेत. या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळणार आहेत.
त्याचबरोबर मुलींच्या मदतीसाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार लाभार्थी मुलींना तब्बल १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या योजनेची अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला या योजनेचे सर्व निकष सांगणार आहोत. या माहितीनंतर लाभार्थी मुलींनी अर्ज भरून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा.
Maharashtra Lek Ladki Yojana: काय आहे योजनेचा उद्देश?
राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना मंजूर केली होती आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू केली होती. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
मुलींना नेमका काय लाभ मिळणार? Lek Ladki Yojana Benefits.
पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिल्या वर्गात ६ हजार रुपये, सहाव्या वर्गात ७ हजार रुपये, ११वी वर्गात ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये देण्यात येतील.
योजना संपूर्ण नाव | लेक लाडकी योजना २०२४ |
सुरू करणार राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी वर्ग | गरीब कुटुंबातील मुली |
मदत स्वरूप | जन्मापासून शिक्षण व मुलीच्या १८ वर्ष वयापर्यंत आर्थिक मदत |
एकूण मदत रक्कम | १ लाख १ हजार रु. |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
कुणाला मिळणार फायदा?
- १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असेल.
- लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा फायदा मिळेल.
- दुसऱ्या अपत्याच्या प्रसुतीदरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एकानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी या योजनेचा अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- ही योजना फक्त महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठीच लागू आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.
फॉर्मची ऑनलाइन पोर्टल वरती नोंदणी करणे! Online Form Registration Process.
लेक लाडकी योजना २०२४ या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी करावी तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर व अपलोड करावी.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा ? Application Form Fill Up Process.
- लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करू शकता.
- अर्ज करण्यासाठी लागणारे संबंधित आवश्यक कागदपत्रे तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
- या योजनेसंबंधीत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे.
- या योजनेसाठी अर्जाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या संबंधित अंगणवाडीला भेट द्या व अंगणवाडी सेविका यांना याबद्दलची माहिती विचारा.
- ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी चा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेला आहे.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काय? Lek Ladki Yojana Documents.
- लाभार्थीचा जन्मदाखला
- कुटंब प्रमुखाचा उत्पन्न दाकला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
- पालकांचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाच छायांकित प्रत
- रेशनकार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड- साक्षांकित प्रत)
- मतदान ओळखपत्र
- संबंदित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.
ऑफलाईन अर्ज आणि इतर माहिती. | |
लेक लाडकी योजना ऑफलाइन फॉर्म | येथे क्लिक करा. |
लेक लाडकी योजना हमीपत्र | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
इतर महत्त्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा. |
Maharashtra Lek Ladki Yojana 2024 FAQs.
१. लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) कोणत्या उद्दिष्टांसाठी सुरू करण्यात आली आहे?
उत्तर: लेक लाडकी योजना मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
२. लेक लाडकी योजनेचा (Lek Ladki Yojana) लाभ कोणाला मिळू शकतो?
उत्तर: या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी मिळू शकतो. लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा फायदा मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
३. योजनेच्या लाभासाठी एकूण किती आर्थिक मदत मिळते?
उत्तर: लाभार्थी मुलींना एकूण १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते, ज्यात जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिल्या वर्गात ६ हजार रुपये, सहाव्या वर्गात ७ हजार रुपये, ११वी वर्गात ८ हजार रुपये, आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मिळतात.
४. Lek Ladki Yojana योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: लेक लाडकी योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो. अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करावा. तसेच, लाभार्थ्यांचे अर्ज आणि सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतील.
५. अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये लाभार्थीचा जन्मदाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शिक्षण दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, आणि मुलगी अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
Maharashtra Lek Ladki Yojana Apply Online
ही माहिती देखील बघा.
उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥