Madh Kendra Yojana Maharashtra 2024
Madh Kendra Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण मध केंद्र योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध सरकारी योजना राबवते. त्यापैकी एक योजना म्हणजे मध केंद्र योजना. ही योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही त्यांच्या उपजीविकेच्या साधनासाठी शेतीवर अवलंबून आहे.
(Madh Kendra Yojana Maharashtra) त्यामुळे शेती व्यवसाय अधिक-अधिक फायदेशीर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते.त्यापैकी एक फायदेशीर योजना म्हणजे मधमाशी पालन योजना,या मधमाशांमुळे शेतीचे उत्पन्न वाढते म्हणून मध उद्योगाला अधिक चालना देण्याची गरज आहे. मध उद्योग हा केवळ शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न ठेवता मुख्य उद्योग बनविल्यास ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिकांजवळ आणि फळबागांजवळ तसेच जंगलात ठेवल्यास पिकाच्या प्रकारानुसार पीक उत्पादनात ५ ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता असते. ही वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मध आणि मेणाच्या किंमतीपेक्षा १० ते १५ टक्के अधिक आहे.
मधमाशी पालन हा एक वैशिष्टयपूर्ण बहुउद्देशीय उद्योग आहे. मध संकलन, परागकणांचे संकलन, मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या वाढविणे, या उद्योगातून उप उत्पादनांचे संकलन, तसेच मराठवाड्यातील तेलबिया पिके आणि पश्चिम घाट व विदर्भातील वनक्षेत्र, कोकण विभागातील जंगले आणि फळबागाचे क्षेत्र अशी वैविध्य पूर्ण निसर्ग संपदा असलेल्या राज्यात विविध नैसर्गिक संसाधने आहेत. विकासाला मोठा वाव आहे. त्या संदर्भात, मधमाशीपालन उद्योग हा उक्त उद्दिष्टांशी सुसंगत उद्योग असल्याने, मधमाशीपालन उपक्रमास उद्योग म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
मध केंद्र योजना काय आहे ? याबद्दल सविस्तर महिती जाणून घेणार आहोत.
१. मध केंद्र योजना कोण राबवणार आहे ?
- महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ.
२. Madh Kendra Yojana Maharashtra योजनेची व्याप्ती.
- सदर योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे.
- या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापन करण्यात आली आहे.
३.Madh Kendra Yojana Maharashtra या योजनेचे काय फायदे असतील ?
- साहित्याच्या स्वरूपात ५०% अनुदान,
- मोफत मध उद्योग शासकीय प्रशिक्षण
४. विशेष बाब.
- शासकीय प्रशिक्षण मोफत दिले जाईल.
- सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल.
- ग्रामीण भागात आर्थिक संधी उपलब्ध होतील.
५. महत्वाचे-Madh Kendra Yojana Maharashtra Important Note
- लाभार्थ्यांना कुठे प्रशिक्षण द्यायचे हे ठरवण्याचे संपूर्ण अधिकार सदर मंडळाला असतील.
- प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी मध केंद्र सुरू करणाऱ्या मंडळाला एक बाँड द्यावा लागतो.
६. अधिक माहितीसाठी संपर्क.
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि. सातारा.
- प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय.
७. संपर्क क्रमांक.
- ०२१६८-२६०२६४
- तसेच अधिक माहितीसाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची अधिकृत वेबसाईट पहा.
खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची अधिकृत वेबसाईटसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
८. Madh Kendra Yojana Maharashtra योजनेचे प्रमुख घटक.
(अ) मधपाळ लाभार्थींची निवड करणे
वैयक्तिक मधपाळ पात्रतेच्या अटी –
- साक्षर असावा.
- स्वतःची शेती असल्यास प्राधान्य.
- १८ वर्षापेक्षा जास्त वय असावे.
- अर्जदाराने मंडळाचे मान्यताप्राप्त प्रशिक्षणकेंद्रात १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहिल.
(ब) प्रगतीशील मधपाळ:-
वैयक्तिक केंद्रचालकासाठी पात्रतेच्या अटी:-
- किमान दहावी पास असावा.
- २१ वर्षापेक्षा जास्त वय असावे.
- अशा व्यक्तिंच्या नावे अथवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान एक एकर शेतजमीन असावी किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी.
- लाभार्थींकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी
संस्था पात्रतेच्या अटी:-
- संस्था नोंदणीकृत असावी.
- संस्थेच्या नांवे मालकीची किंवा दहावर्षांसाठी भाडयाने घेतलेली कमीत कमी १ एकर शेतजमीन असावी.
- प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नांवे अथवा भाडयाने घेतलेली किमान ५०० चौ.फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी.
- संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादन बाबतीत प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. (लाभार्थी मध उद्योग करणा-या परिसरात मधमाशांना उपयुक्त फुलोरा असणा-या वनस्पती, शेती पिके फळझाडे असणा-या परिसरातील लाभार्थीची निवड केली जाईल.
(क) निवडलेल्या व्यक्तिस/संस्थेच्या कर्मचा-यास प्रशिक्षण:-
- १. मधपाळ प्रशिक्षण:- मधपाळास मध संचालनालयामार्फत किंवा संचालनालय ठरवेल त्या संस्था/व्यक्तिमार्फत १० दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
- २.प्रगतीशील मधपाळ प्रशिक्षण प्रगतीशील मधपाळ किंवा संस्थेच्या सभासदास/कर्मचा-यास मध संचालनालय, महाबळेश्वर येथे २० दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
अर्थसहाय्य व अनुदानाचे स्वरुप –
५० टक्के रक्कम ही अनुदान स्वरुपात व ५० टक्के रक्कम ही लाभार्थीचा हिस्सा म्हणून कर्जाच्या स्वरुपात.
मध केंद्र योजनेचे फायदे | Madh Kendra Yojana Maharashtra Benefits.
- १. मध केंद्र या योजने अंतर्गत आपल्याला स्वतःचे मध केंद्र सुरु करण्यासाठी राज्यातील शेतकरी, मधपाळ तसेच इच्छुक तरुण/तरुणीस महाराष्ट्र राज्य शासनाकडून योजनेच्या खर्चाची ५० टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपात देण्यात येते.Madh Kendra Yojana Maharashtra.
- २. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.
- ३. मध केंद्र योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या नव नवीन संधी उपलब्ध होतील.
- ४. या योजनेंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वत:चा स्वयंरोजगार उभारता येईल जेणेकरून त्यांना नोकरीसाठी भटकंती करण्याची गरज भासणार नाही.
- ५. मध केंद्र योजनेच्या मदतीने राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
- ६. राज्यातील तरुण/तरुणी सशक्त व आत्मनिर्भर बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम होतील
- ७. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वत:चा स्वयंरोजगार सुरू करता येईल आणि राज्यातील इतर बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील.
- ८. मध केंद्र योजनेच्या मदतीने शेतकरी त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवू शकतील.Madh Kendra Yojana Maharashtra.
- ९. मध केंद्र योजनेंतर्गत, महाराष्ट्र शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते, त्यामुळे शेतकरी, मधमाशीपालन, तरुण/तरुणी यांना कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
- १०. या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी वर्ग, मधपाळ आणि बेरोजगार तरुण/तरुणी यांचा आर्थिक विकास होईल.
- ११. या योजनेच्या मदतीने शेतकऱ्याचे जीवनमान सुधारून त्याचे भविष्य उज्ज्वल होईल.
मध केंद्र योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for Madh Kendra Yojana.
- अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा.
- अर्जदारचा आधार कार्ड.
- अर्ज दाराचे नाव असलेले रेशन कार्ड.
- रहिवासी दाखला.
- शैक्षणिक प्रमाणपत्र.
- मोबाईल नंबर.
- ई – मेल आयडी.
- पासपोर्ट साईज फोटो.
- बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
- मधमाशी पालन प्रमाणपत्र असल्यास किंवा नसल्यास.
मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत | Madh Kendra Yojana Application Process.
- सर्व प्रथम अर्जदाराने त्याच्या जिल्हा कार्याल येथे जावे लागेल.
- तुमच्या जिल्हातील खादी व ग्रामोद्योग केंद्र कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
- अर्जामध्ये ही काही माहिती विचारलेली आहे ती सर्व भरा आणि आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती अर्जाला जोडा.
- सदर भरलेला अर्ज तुमच्या जिल्हातील खादी व ग्रामोद्योग कार्यालयात जमा करावा लागतो.
- हे या योजनेअंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करेल.
👇ही योजना देखील बघा👇
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी १ जुलैपासून अर्ज सुरू !
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.