Income Certificate Apply Online In Maharashtra 2024: उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

Income Certificate Apply Online In Maharashtra.

नमस्कार मित्रांनो,उत्पन्नाचा दाखला आपल्याला शासकीय योजनेसाठी, शिक्षणासाठी किंवा इतर योजनेसाठी महत्वाचा असतो. उत्पन्न Income Certificate Apply Online दाखला मिळण्यासाठी योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास खूप कमी दिवसात उत्पन्न दाखला मिळू शकतो उत्पन्न दाखला ऑनलाईन कशाप्रकारे मिळवावा यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” खालील वेबसाईट ओपन करायची आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यानंतर तुम्हाला नवीन यूजर पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करावी लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या सरकारी पोर्टलवर (युजर प्रोफाईल) नोंदणी कशी करावी? Apply Online for Caste Certificate हे आपण मागील लेखात पाहिले आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि लॉगिन करावे लागेल.

Caste Certificate

आता तुमच्या समोर आपले सरकारचे एक पेज उघडेल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्रजी किंवा मराठी भाषा निवडण्याचा पर्याय आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायची असेल तर इंग्रजीवर निवडा आणि त्याखालील मराठी भाषा पर्याय निवडा.

त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला विविध सरकारी सेवा दिसतील, तिथे तुम्हाला “महसूल विभाग” हा पर्याय निवडावा लागेल.

त्यानंतर उपविभागात ‘महसूल सेवा’ निवडा. हा विभाग निवडल्यावर, त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल. यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र यांसारखे अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी ‘मिळकतीचे प्रमाणपत्र’ या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ‘पुढे जा’ बटणावर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामधील मिळकतीचे प्रमाणपत्र या ऑपशन वर क्लिक करा.

नंतर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हा ऑपशन येईल तर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पुढील कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे:

ओळखीचा पुरावा (किमान -1)

  • पारपत्र
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदाता ओळखपत्र
  • अर्जदाराचा फोटो
  • निमशासकीय ओळखपत्र
  • आर एस बी वाय कार्ड
  • म्रारोहयो जोब कार्ड
  • वाहन चालक अनुज्ञप्ती

पत्त्याचा पुरावा (किमान -1)

  • पारपत्र
  • वीज देयक
  • भाडे पावती
  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • दूरध्वनी देयक
  • पाणीपट्टी पावती
  • मालमत्ता कर पावती
  • मतदार यादीचा उतारा
  • वाहन चालक अनुज्ञप्ती
  • मालमत्ता नोंदणी उतारा
  • ७/१२ आणी ८ अ चा उतारा

इतर दस्तऐवज (किमान -1)

वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य / वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

वयाचा पुरावा (किमान -1)

  • जन्माचा दाखला
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
  • सेवा पुस्तिका (शासकीय / निम – शासकीय कर्मचारी)

उत्पन्नाचा पुरावा (किमान -1)

  • आयकर विवरण पत्र
  • सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल
  • वेतन मिळत असल्यास फॉर्म न १६
  • निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र
  • अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणी 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल
  • अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)
  • इतर

स्वघोषणापत्र

आवश्यक कागदपत्रे पहा आणि त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा, व नंतर उत्पन्न प्रमाणपत्र हे पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला एक फॉर्म आलेला असेल (Application Form) या फॉर्ममध्ये दाखवल्याप्रमाणे आपली माहिती भरा.

जर आपल्याला दाखला ३ वर्षासाठी हवा असेल तर Income Year मध्ये ३ वर्षासाठी किंवा १ वर्षाचा हवा असेल तर १ वर्षासाठी निवडा.

Certificate
Income Certificate Apply Online

वैयक्तिक तपशिल: यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, राष्ट्रीयत्व, व्यवसाय तत्सम माहिती निवडा.

अर्जदाराच्या निवासाचा तपशिल: यामध्ये गाव, तालुका, जिल्ह्यासोबत या section मध्ये तुमचा पत्ता भरा. जर तुमच्याकडे PAN कार्ड असेल तर PAN Card चा नंबर भरा.

कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहीती: यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांची शैक्षेनिक माहिती भरा.

लाभार्थीचा तपशील: यामध्ये ज्याच्यासाठी दाखला काढायचा आहे त्याची माहिती आणि कशासाठी दाखला लागत आहे याचे कारण लिहा.

कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण: यामध्ये कुटुंबातील सदस्याचे नाव, त्याच्या नावावर असलेली जमीन, जमिनीचा प्रकार, जिल्हा, तालुका, अन गाव जिथे ही जमीन आहे हे भरा.Income Certificate Apply Online. 

विविध स्रोतांमार्फत कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील: यामध्ये विविध क्षेत्रातून मिळणाऱ्या तुमच्या उत्पन्नाचे विवरण इथे लिहा.

उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र: यामध्ये इथे तुम्ही जोडणार असणारे कागदपत्र निवडा. नंतर “मला मंजूर” वर टिक करा आणी समावेश करा वर क्लिक करा.

“समावेश करा” वर क्लिक केल्यानंतर दाखल्यासाठी कागदपत्र अपलोड करणे हे पेज ओपन होईल, इथे तुम्हाला लागणारी कागदपत्रे जोडायची आहेत.

तुम्ही अपलोड करणारे कागदपत्रे हे 75 ते 500KB या साईज मध्ये हवे आहेत. त्यासाठी अर्ज भरण्यापूर्वीच या https://picresize.com/ वर जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंटची साईज वाढवू किंवा कमी करू शकता.

200 ते 212 पिक्सेल उंची अन 160 पिक्सेल रुंदी याप्रमाणात तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. ज्यांच्याकडे अशा प्रमाणात फोटो आहे त्यांनी फोटो अपलोड करा.

बहुतांश लोकांकडे याप्रमाणात फोटो नसतो, ज्यांच्याकडे या प्रमाणात फोटो नाही किंवा ज्यांना माहितीच नाही आपल्या फोटोची साईज त्यांनी CLICK Here To Crop Photo यावर click करा. एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेज मध्ये आपल्याकडे असेलला फोटो अपलोड करा. तिथे तुमचा Income Certificate Apply Onlineफोटो योग्य प्रमाणात crop होईल. हा Crop झालेला फोटो download करा. अन मग तो अपलोड करा.

त्यानंतर पैसे भरणे हा ऑपशन येईल. यासाठी तुम्ही कोणत्याही (Online Banking/ Credit Card/ Debit Card/ PayTm / ATM / BHIM App / UPI) पद्धतीने पैसे भरू शकता.

पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज तत्सम अधिकाऱ्याकडे जाईल. अर्ज केल्यापासून १५ दिवसात तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळेल.

Income Certificate Apply Online In Maharashtra 2024 FAQs. 

१. उत्पन्नाचा दाखला कशासाठी आवश्यक आहे?
उत्तर: Income Certificate Apply Online उत्पन्नाचा दाखला शासकीय योजना, शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, आणि विविध सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतो. याच्या आधारे व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणित केले जाते, ज्यामुळे त्यांना विविध आरक्षण व अनुदान मिळवता येते.

२. उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन Income Certificate Apply Online काढण्यासाठी कोणती वेबसाइट वापरावी लागते?
उत्तर: उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांना “आपले सरकार” या वेबसाइटचा (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) वापर करावा लागतो.

३.  उत्पन्नाचा दाखला अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: उत्पन्नाचा दाखला अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड), पत्त्याचा पुरावा (उदा. वीज बिल, रेशन कार्ड), उत्पन्नाचा पुरावा (उदा. आयकर विवरण पत्र, फॉर्म १६) आणि इतर अनिवार्य कागदपत्रे (उदा. स्वघोषणापत्र) आवश्यक असतात.

४. Income Certificate Apply Online अर्ज भरल्यानंतर उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: उत्पन्नाचा दाखला अर्ज केल्यापासून साधारणतः १५ दिवसांच्या आत प्राप्त होतो.

५. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी कोणते पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत?
उत्तर: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, जसे की Online Banking, Credit Card, Debit Card, PayTm, ATM, BHIM App, UPI इत्यादी.Income Certificate Apply Online

६. अर्ज करताना फोटो आणि कागदपत्रांचे आकार कसे ठेवावे?
उत्तर: अर्ज करताना अपलोड केलेले कागदपत्रे 75 ते 500KB साईजमध्ये असावी. फोटो अपलोड करताना तो 200 ते 212 पिक्सेल उंची आणि 160 पिक्सेल रुंदीमध्ये असावा. जर फोटो किंवा कागदपत्रांची साईज हवी तशी नसेल तर https://picresize.com/ या वेबसाइटवर जाऊन त्यांचे आकार बदलता येतात

Income Certificate Apply Online In Maharashtra.

Income Certificate Apply Online

ही माहिती देखील बघा.

जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा?

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment