Aapli Chawdi – How To Apply Online Birth Certificate | जन्म नोंद दाखला ऑनलाईन अर्ज कसा करावा ? सविस्तर माहीत जाणून घेऊया !

How To Apply Online Birth Certificate In Maharashtra. 

जन्म प्रमाणपत्र (जन्म दाखला) हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्म दाखला हे पहिले जन्म दिनांक आणि ठिकाण दर्शविणारा आपल्यासाठी एक महत्वाचे ओळखपत्र आहे. विविध सरकारी योजनांच्या सेवा सवलतींचा लाभ घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्यूची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड/नगरपालिका इत्यादींना जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत माहिती द्यावी.
वरील मुदतीच्या आत जन्म आणि मृत्यूच्या नोंदी आणि माहिती वेळेवर देणे कायद्याने बंधनकारक आहे. जर तुम्ही वरील मुदतीच्या आत नोंदणी करून लगेच जन्म प्रमाणपत्र (जन्म दाखला) Apply for Birth Certificate in maharashtra मागितले तर तुम्हाला ते मोफत मिळेल.

वरील दिलेल्या मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो आपणाला मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे काही पैसे आकारले जातात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला शासनाच्या नियमाप्रमाणे ठरून दिलेले शुल्क भरून पोस्टाने देखील मागविता येतो. दिलेल्या मुदतीत जन्म-मृत्यूची नोंदणी न केल्यास विलंब शुल्क आकारले जाते. त्यामुळेच जन्म-मृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. तर आज या लेखात आपण स्टेप बाय स्टेप ऑनलाइन जन्म नोंद दाखला कसे मिळवायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

How To Apply Online Birth Certificate:जन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्याची संपूर्ण प्रक्रिया. 

जन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोबाईल किंवा कॅम्प्युटर वरती “आपले सरकारची” हि अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.खालील लिंक वरती क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://aaplesarkar.mahaonline.gov.in

 How To Apply Online Birth Certificate In Maharashtra
How To Apply Online Birth Certificate In Maharashtra

या नंतर न्यू (नवीन) यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा वापरात असलेला मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. जन्म नोंद दाखला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल. तो तेथे टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, हे सर्व झाल्या नंतर तेथेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

How To Apply Online Birth Certificate In Maharashtra
How To Apply Online Birth Certificate In Maharashtra

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे नावाने एक नवीन पेज उघडेल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्रजी किंवा मराठी भाषा निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर मराठी भाषा निवड अथवा इंग्रजी भाषा निवडा असे तेथे पर्याय आपल्याला दिले गेले आहेत. त्यामुळे आपल्याला हव्य असलेल्या भाषेत आपण संपूर्ण प्रोसेस पुढे चालू ठेऊ शकता. हे सर्व झाल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या तिथे आपल्याला दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.How To Apply Online Birth Certificate

"ग्रामविकास व पंचायत राज विभाग"
     “ग्रामविकास व पंचायत राज विभाग”

तुम्ही “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा विभाग निवडल्यानंतर त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व सेवांची यादी तुम्हाला दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला How To Apply Online Birth Certificate मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेचसे पर्याय दिसतील. त्यातील तुम्हाला “जन्म नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

How To Apply Online Birth Certificate In Maharashtra
                                                   How To Apply Online Birth Certificate In Maharashtra

जन्म नोंद दाखला – अर्जदाराची संपूर्ण माहिती नोंदणी:

अर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराने स्वतःची संपूर्ण माहिती भरायची आहे. यामध्ये अर्जदाराचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, अर्जदाराचे संपूर्ण नाव (इंग्रजी), जन्म तारीख, मोबाईल नंबर,आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व खाली दिलेल्या “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.How To Apply Online Birth Certificate. 

How To Apply Online Birth Certificate In Maharashtra
                               How To Apply Online Birth Certificate In Maharashtra

अर्जदाराची संपूर्ण माहिती..

समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल किंवा कॅम्प्युटर स्क्रीन वर एक मॅसेज फ्लॅश होईल त्यात तुमचा अर्ज यशस्वीरीत्या Online Birth Certificate,जतन करण्यात आला आहे व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो सेव करून ठेवा किंवा त्याचा स्क्रीन-शॉट काढून सेव करून ठेवा.

तसेच त्या आलेल्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, जन्म नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे पैसे आकारले जाते, ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit / Debit Card, IMPS, UPI या पेमेंट च्या माध्यमातून भरू शकता.

शुल्क भरल्यानंतर तुम्हाला ५ दिवसातच तुम्हाला जन्म नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून लंमिनेशन करून नीट जतन करून ठेवा.

मृत्यु नोंद दाखला ऑनलाईन काढण्याची संपूर्ण प्रक्रिया.

जन्म प्रमाणपत्राचे फायदे.

  • बाळंतपणासाठी शासकीय फायदे.
  •  लसीकरण.
  • शिधापत्रिकेत नाव नोंदणी करण्यासाठी.
  • शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी.
  • जातीचा दाखला मिळवण्यासाठी.
  • रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी.
  • इतर कायदेशीर कामे.
  • पारपत्र घेण्यासाठी.
  • आर्युर्विमा.
  • मतदार नावनोंदणी.
  • वाहनचालक परवाना.
  • विमा, आजारपण विमा.
  • नोकरी,शासकीय नोकरी.
  • विवाह प्रमाणपत्र, विवाह.

FAQs

१. How To Apply Online Birth Certificate- महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
उत्तर: महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, आपल्याला “आपले सरकार” या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

२. “आपले सरकार” पोर्टलवर कसे नोंदणी करावी?
उत्तर: “आपले सरकार” पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला नवीन यूजर म्हणून नोंदणी करावी लागेल. त्यासाठी मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवा.

३. अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसात प्रमाणपत्र मिळेल?
उत्तर: अर्ज सादर केल्यानंतर, तुम्हाला अंदाजे ५ दिवसात “आपले सरकार” वेबसाइटवरून जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.

४. जन्म प्रमाणपत्रासाठी किती शुल्क आकारले जाते?
उत्तर: जन्म प्रमाणपत्रासाठी २३.६० रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क तुम्ही Wallet, Net Banking, Credit/Debit Card, IMPS, UPI या माध्यमातून भरू शकता.

५. अर्जात काही त्रुटी असल्यास काय करावे?
उत्तर: अर्जात काही त्रुटी असल्यास, तुम्ही आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करून त्रुटी दुरुस्त करू शकता. किंवा संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका कार्यालयात संपर्क साधू शकता.

६. अर्ज केल्यानंतर अर्ज क्रमांक कसा मिळवायचा?
उत्तर: अर्ज सादर केल्यानंतर, तुम्हाला एक यशस्वीतेचा संदेश दिसेल, ज्यामध्ये अर्ज क्रमांक दिला जाईल. तो क्रमांक सेव करून ठेवावा किंवा त्याचा स्क्रीन-शॉट काढून ठेवावा.

How To Apply Online Birth Certificate
How To Apply Online Birth Certificate

👇ही माहिती देखील बघा👇

मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन अर्ज कसा करावा ? सविस्तर माहीत जाणून घेऊया !

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment