Aapli Chawdi – Gram Sabhas Video Recording Detail Information | ग्रामसभांचे होणार व्हीडीओ रेकॉर्डींग अंमलबजावणी चालू एका ग्रामपंचायत वर गुन्हा दाखल. 

Gram Sabhas Video Recording Detail Information

कागदोपत्री ग्रामसभांना आता लागणार चाप प्रत्येक सभेचे व्हिडीओ अपलोड करण्याचे केंद्राचे आदेश.

प्रोसीडींग मधील अफरातफरला बसणार चाप: अंमलबजावणी होणार.

ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्षभरातून चार ते पाच ग्रामसभा होत असतात. या ग्रामसभांमध्ये सरपंचासह गाव पुढारी सोयीचे विषय समाविष्ट ग्रामस्थांसमोर न करता ते प्रोसेडींगमध्ये नंतर समाविष्ट करून आपला हेतू साध्य करतात. Gram Sabhas Video Recording Detail Information मात्र या परंपरेला आता चाप बसणार आहे. यापुढे आता ग्रामसभांचे थेट व्हीडीओ-ऑडीओ रेकॉर्डींग केले जाणार असुन तसे आदेश राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक आ.सु.भंडारी यांनी राज्यभरातील जि.पच्या ग्रामपंचायत विभागाला दिले आहे.

गाव पातळीवर करावयाची विकास कामे, गावाच्या हिताचे निर्णय ग्रामसभांमध्ये होवून त्याचा आराखडा देखील ग्रामसभांमध्ये मंजूर केले जातात. या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांकडून गावातील करावयाच्या कामांच्या सुचना देतात त्यानुसार आराखड्यात समाविष्ट केले जातात याच ग्रामसभांचे ग्रामसेवकांकडून पोसेडीग लिहीले जाते.Gram Sabhas Video Recording Detail Information मात्र बहुतांश गावांमध्ये सरपंच अथवा गाव हा आपल्या हिताचेनिर्णय सभेत न मांडता ते आडमार्गानि प्रोसेडीमध्ये समाविष्ट करून घेत असल्याने हा प्रकार नंतर लक्षात येवून अनेक वेळा बाद उदभवतात, तसेच अनेक ठिकाणी तर ग्रामसभा ग्रामस्थांच्या नुसत्या स्वाक्षऱ्या घेवून कागदोपत्री दाखविल्या जातात मात्र या पुढे अशा प्रकारांना चाप बसणार असून ग्रामसभांचे व्हीडीओ रेकॉर्डींग बंधणकारक करण्यात आले आहे.

शासनाकडून व्हीडीओसाठी जीएस निर्णय अँप.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामसभेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत विकसीत करण्यात आलेल्याजीएस निर्णय’ ॲपवर टाकावे लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचाना हे अँप डाऊनलोड करून त्यात ग्रामसभेत घेतलेल्या सगळ्या निर्णयाचा किमान २ मिनीट ते १५ मिनीटाचा व्हीडीओ रेकार्ड करून तो अँपवर अपलोड करावा लागणार आहे.

केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाकडून जीएस निर्णय हे अँप तयार करून त्यात ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाचा १५ मिनीटाचा व्हीडीओ या अँपमध्ये अपलोड करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामसभेत कोणते निर्णय घेण्यात आले याची माहीती उपलब्ध होणार आहे. आता पर्यंत ग्रामसेवकाकडून ग्रामसभाचे लेखी प्रोसेडींग केले जात होते. मात्र आता या पुढे या ग्रामसभेचे प्रोसेडीग बदलणे शक्य होणार नाही. Gram Sabhas Video Recording Detail Information याबाबत बिडीओ स्तरावर सुचना केल्या असुन बैठकीत नसे आदेश देखील देण्यात आले आहे.

सरपंचांसह ग्रामसेवकांची डोकेदुखी वाढणार.

दरवेळेस ग्रामसभा घेवून अथवा कागदोपत्री दाखवून निर्णयाच्या लपवाछपवीला आता आळा बसणार आहे. ग्रामसभेत घेतलेले. सर्व निर्णय १५ मिनीटाच्या व्हीडीओतून सांगुन ते अपलोड करण्याच्या निर्णयाने पारदर्शकता येणार असली तरी सरपंच व ग्रामसेवकांची डोकेदुखी वाढणार आहे. ग्रामस्थांकडून लपवून सोयीच्या विषयांना आता मुरड घालावी लागणार आहे.Gram Sabhas Video Recording Detail Information.

बीडीओचा असणार वाँच.

प्रत्येक तालुक्यात ग्रामपंचायती गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असतात त्यामुळे गावामध्ये ग्रामसभाझाल्या कि नाही याची पडताळणी त्यांना करावी लागणार आहे. अपलोड केलेले व्हीडीओ पाहून अप्रूव्ह किया रिजेक्ट करण्याची जबाबदारी त्यांची राहाणार आहे.

ग्रामसभांचे वेळापत्रक भरणे बंधणकारक.

केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाकडून गेल्या वर्षांपासून जीएस निर्णय हे अँप विकसीत करण्यात आले असले तरी राज्यभरातून एक ही व्हीडीओ या अँपमध्ये टाकण्यात आला नाही. मात्र आता ग्रामसभांचे व्हीडीओ बंधणकारक करण्यात आले आहे.Gram Sabhas Video Recording Detail Information जीएस निर्णय हे अँप व्हायब्रन्ट ग्रामसभा पोर्टलशी जोडण्यात आले आहे.त्यामुळे व्हायब्रन्ट ग्रामसभा पोर्टल मध्ये ग्रा.पर्ने ग्रामसभांच वेळापत्रक यात भरणे अनिवार्य करण्यात आले आहे यासाठी ई ग्रामस्वराजसाठी असलेल्या यूजर आयडी व पासवर्डचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच अधिकायांना जून, सप्टेंबर, डिसेंबर व मार्च अखेरचे ग्रामसभांचे अहवाल देखील सादर कराव लागणार आहे.

कागदोपत्री ग्रामसभांना बसणार आळा…

काही गावात ग्रामसभा होत नाहीत. फक्त कागदी ग्रामसभा होत्या. अशा गावांचे प्रशासक गावासाठी त्यांचे सोयीचे निर्णय लागू करतात. परिणामी गावाचा अपेक्षेप्रमाणे विकास होत नाही. आता या नव्या निर्णयामुळे पेपरलेस ग्रामसभांना आळा बसणार आहे.

ग्रामसभेचा द्यावा लागणार सारांश…

जी एस निर्णय हे राष्ट्रीय ग्राम स्वराज मिशन अंतर्गत तयार केलेले ॲप आहे. हे ॲप सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. Gram Sabhas Video Recording Detail Information ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयाचा सारांश किमान २ मिनिटे ते जास्तीत जास्त १५ मिनिटांच्या कालावधीसाठी ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करणे आवश्यक आहे. त्यानंतर ते सदर ॲपवर अपलोड करावे लागेल.

गटविकास अधिकारी करणार पडताळणी…

तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामसभा झाल्या आहेत की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. अपलोड केलेले व्हिडिओ पाहून ते पुढील कारवाई करतील.Gram Sabhas Video Recording Detail Information.

ग्रामसेवकांनी अँपचा वापर करावा…

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आता प्रत्येक ग्रामसभेच्या कामकाजाची माहिती जी एस निर्णय ॲपद्वारे नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामात पारदर्शकता येणार आहे. ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. ग्रामसभेच्या कामकाजात कोणताही बदल करता येणार नाही.

👇हे देखील वाचा 👇

MSCIT सर्टिफिकेट हरवले किंवा खराब झाले असेल तर डुप्लिकेट सर्टिफिकेट कसे मिळवावे.(Click here)

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

 

Leave a Comment