Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect App
Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect App: नमस्कार मित्रांनो, आजच्या आमच्या नवीन लेखात स्वागत आहे. नेहमीप्रमाणे देखील आम्ही तुमच्यासाठी काही नवीन आणि महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण सर्व ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे पहायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, कोणत्याही गावाच्या विकासाचे मुख्य केंद्र त्या गावाची ग्रामपंचायत असते. या ग्रामपंचायतीकडून अनेक प्रकारचे दाखले मिळतात. जसे की जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घरपट्टी, पाणीपट्टी प्रमाणपत्र, विविध उतारे. मात्र आता तुम्हाला ही ग्रामपंचायतींची दाखले आणि प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलवर पाहता येणार आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.
तालुक्यातील ९६ गावांतील ग्रामस्थांना आता ७४ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून घरपोच विविध दाखले मिळणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने महा ई-ग्राम सिटीझन कनेक्ट (Maha-e-gram Citizen Connect Mobile App ) अँप विकसित केले आहे. या अँपद्वारे ग्रामपंचायतींकडून विविध सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येतो. गावकऱ्यांना आता घरपट्टी व पाणीपट्टी व कर भरण्यासाठी आणि जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला,मालमत्तेसंबंधीचे उतारे यासाठी ग्रामपंचायतीकडे जाण्याची गरज नाही. ग्रामस्थांना विविध दाखल्यांसाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या चकरा माराव्या लागतात.
परंतु प्रत्येक वेळी वेळेत दाखल मिळणारच, याची शाश्वती नसते. त्यामुळे नागरिकांना घरपोच अनेक सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने हे अँप सुरू केले आहे. हे अँप नागरिकांसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Gram Panchayat Maha-e-gram Citizen Connect App अँपद्वारे हे दाखले मिळणार.
- जन्म नोंदीचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील दाखला
- मृत्यू नोंदीचा दाखला
- विवाह नोंदीचा दाखला
- कर भरणा (घरपट्टी/पाणीपट्टी इ.)
- ग्रामपंचायत पदाधिकारी यांची माहिती.
ग्रामपंचायती चे सर्व दाखले / प्रमाणपत्र पहा तुमच्या मोबाईलवर.
Friends, the main center of development for any village is the Gram Panchayat of that village. Many types of certificates are available from the Gram Panchayat, such as birth certificates, death certificates, marriage registration certificates, land lease certificates, water lease certificates, and various extracts. But now you can view these Gram Panchayat certificates and documents on your mobile. Read this article till the end to learn about all these things.
ग्रामपंचायत चे सर्व दाखले आणि प्रमाणपत्र मोबाईल वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स नुसार फॉलो करा.
स्टेप १: मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्ले-स्टोअर (Play Store) उघडावे लागेल आणि त्यात महाग्राम (Maha-e-gram) सर्च करायचे आहे. सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्याच नंबरला ते अँप दिसेल ते म्हणजे Gram Panchayat Maha-e-gram Citizen Connect (e-Governance Solutions) इन्स्टॉल बाटणवर क्लिक करून ते अँप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. त्या नंतर ते ओपन करायचे आहे.
स्टेप २: मित्रांनो, Gram Panchayat Maha-e-gram Citizen Connect (e-Governance Solutions) हे अँप ओपन केल्यावर तुम्हाला तेथे काही परमिशन्स विचारल्या जातील त्यापैकी While using the app ह्या पर्याया क्लिक करून परमिशन्स allow करायचे आहेत.
स्टेप ३: परमिशन्स allow केल्या नंतर तुमच्या समोर खाली दिलेल्या फोटो प्रमाणे एक नवीन पेज चालू होईल त्यावर तुम्हाला तुमचे एक नवीन अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी खाली दिलेल्या Don’t have account? Register या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप ४: Don’t have account? Register या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर पुढील पेज वर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव जसकी (नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि आडनाव) टाकावे लागेल. मग तुम्हाला तुमचे लिंग निवडावे लागेल म्हणजे स्त्री किंवा पुरुष सिलेक्ट करायचे आहे.नंतर तुमची जन्मतारीख टाका.त्याखाली तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाकून नंतर जतन करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप ५: जतन करा या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर, आपण प्रविष्ट केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल,आपल्याला खाली दाखवलेल्या फोटो मध्ये दिलेल्या जागेवर ओटीपी प्रविष्ट करावा लागेल. आणि नंतर Confirm बटणावर क्लिक करायचे आहे.
स्टेप ६: Confirm बटणावर क्लिक नंतर तुमचे अकाउंट यशस्वीपणे उघडेल. व नंतर तुम्हाला मोबाईल नंबर एक मेसेज मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड आला असेल. तो तुम्हाला आलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून पुढे लॉग इन (Login) करावे लागेल.
स्टेप ७: तुम्ही लॉग इन (Login) केल्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. आणि मग तुम्हाला तुमचे गाव किंवा तुमची जी ग्रामपंचायत असेल ती निवडावी लागेल. आणि नंतर सबमिट (Submit) बटणावर क्लिक करायचे आहे.
स्टेप ८: सबमिट (Submit) बटणावर क्लिक केल्या नंतर तुमची ग्रामपंचायत मॅप केली जाईल. व तुमच्या सोमोर आलेल्या नवीन इंटरफेसवर तुम्हाला ‘समजले’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप ९: ‘समजले’ या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला पुढे काही पर्याय दिसतील, जसे की दाखले/प्रमाणपत्रे, कर भरणे इ. सर्व प्रथम तुम्हाला दाखले/ प्रमाणपत्रे वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांना ‘समजले’ वर या पर्याया वर क्लिक करावे लागेल.
मित्रांनो, या पर्याया मध्ये तुम्ही जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, मूल्यांकन उतारा अशी विविध प्रकारची दाखले/प्रमाणपत्र काढू शकाल.
पाणीपट्टी किंवा घरपट्टी ऑनलाईन भरणा:
तसेच मित्रांनो, जर तुम्हाला पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरायची असेल तर तुम्हाला तो पर्याय निवडावा लागेल आणि ओके (Ok) बटणावर क्लिक करावे लागेल आणि नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडावी लागेल आणि नंतर उत्पन्न क्रमांक जोडावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची घरपट्टी, पाणीपट्टी पाहू शकाल आणि त्याचे पैसे ऑनलाईन भरू शकाल.
मित्रांनो, याशिवाय इथे तुम्हाला आपले सरकार सुविधा हा पर्यायही दिला आहे. आपले सरकारच्या माध्यमातून कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत ते तुम्ही पाहू शकता. तसेच, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीला काही सूचना करायच्या असतील किंवा द्यायच्या असतील, तर तुम्ही सूचना पेटी या पर्यायामध्ये देऊ शकता. तुम्ही दिलेली सूचना ऑनलाइन पद्धतीने ग्रामपंचायती पर्यंत पोहोचेल.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
टीप:- मित्रांनो, जर तुम्ही ग्रामपंचायती मध्ये नोंदणीकृत असाल तर तुम्ही या सर्व प्रकारची कागदपत्रे पाहू आणि डाउनलोड करू शकता. हे अँप नवीन असल्याने, त्यात अजून काही सुधारणा करायच्या आहेत.
तर मित्रांनो, हे अँप आपले सरकारने लॉन्च केले आहे. अजून काही गोष्टी अपडेट करायच्या आहेत आणि काही दिवसांनी तुम्ही हे अँप वापरून तुमचे दाखले मोबाईलवर पाहू शकता. तसेच, जर तुम्हाला हा लेख आवडला किंवा तो महत्व पूर्ण वाटला असेल तर कृपया तुमच्या मित्र मंडळीन सोबत शेअर करा.
Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect Mobile App FAQs
१. Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect app अँप कशासाठी आहे?
उत्तर: Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect अँपद्वारे नागरिकांना विविध ग्रामपंचायत प्रमाणपत्रे आणि सेवा मोबाईलवर मिळतात, जसे की जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घरपट्टी, पाणीपट्टी, इत्यादी.
२. Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect app हे अँप कुठून डाउनलोड करू शकतो?
उत्तर: Maha E Gram Citizen Connect app अँप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
३. Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect app अँप वापरण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर: अँप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला नवीन अकाउंट तयार करून, मोबाईल नंबर आणि इतर माहिती नोंदवून लॉगिन करावे लागेल.
४. Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect app अँपवर कोणकोणती प्रमाणपत्रे आणि दाखले मिळू शकतात?
उत्तर: अँपवर जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, मालमत्तेसंबंधीचे उतारे, आणि कर भरणा प्रमाणपत्रे मिळू शकतात.
५. Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect app अँपवर दाखले डाउनलोड करण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर: अँपवर लॉगिन करून, दाखले/प्रमाणपत्रे या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.
६. पाणीपट्टी किंवा घरपट्टी कशी भरावी?
उत्तर: पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरण्यासाठी अँपवर संबंधित पर्याय निवडून, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडून आणि उत्पन्न क्रमांक जोडून, ऑनलाइन पद्धतीने पैसे भरता येतील.
७. Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect app अँप वापरण्याचे फायदे काय आहेत?
उत्तर: अँपद्वारे नागरिकांना ग्रामपंचायतीच्या चकरा न मारता, घरबसल्या विविध प्रमाणपत्रे आणि सेवा मिळतात, वेळ वाचतो आणि सोयीस्कर होतो.
८. Gram Panchayat Maha E Gram Citizen Connect app अँपवर कसे नोंदणी करावी?
उत्तर: अँपवर नवीन अकाउंट तयार करण्यासाठी नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भरून नोंदणी करावी लागते.
👇ही माहिती देखील बघा👇
जन्म नोंद दाखला ऑनलाईन अर्ज कसा करावा ? सविस्तर माहीत जाणून घेऊया !
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.