Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना – ऑनलाइन,अर्ज,उद्देश,पात्रता,कागदपत्रे,संपूर्ण माहिती

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana.

शेती व्यवसाय करताना विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते व त्याचा लाभ शेतकरी व त्याच्या कुटुंबाला दिला जातो.

गोपीनाथ सुधारित स्वरूपात राज्यातील सर्व नोंदणीकृत खातेदार शेतकऱ्यांना विमा छत्र प्रदान करण्यासाठी तसेच शेतकरी कुटुंबातील कोणतीही १ व्यक्ती जी नोंदणीकृत खातेदार (आई-वडील, शेतकऱ्याचे पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी) म्हणून नोंदणीकृत नाही. असे १० ते ७५ वयोगटातील एकुण २ जणांना विमाछत्र प्रदान करण्यासाठी सुधारित स्वरुपात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत संरक्षण प्रदान करण्यासाठी, कुटुंबाच्या व्याख्येमध्ये शेतकऱ्याचे आई-वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात आलेला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नुकसान भरपाई व पात्रता. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघाताची बाब – नुकसान भरपाई. 

क्रमांक  अपघाताची बाब  नुकसान भरपाई
अपघाती मृत्यू  रु.२,००,०००/
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.२,००,०००/
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.१,००,०००/

लाभार्थी पात्रता. 

महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील वर नमूद केलेला कोणताही १ सदस्य.

योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.

(Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana)

कोणी सुरु केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी राज्यातील शेतकरी
उद्दिष्ट शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन
वेबसाईट krishi.maharashtra.gov.in

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आवश्यक कागदपत्रे.

  • ७/१२ उतारा
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • प्रथम माहिती अहवाल
  • बँकेचे नाव
  • बचत खाते क्रमांक
  • आय एफ एस सी कोड
  • शिधापत्रिका
  • विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू. उंचावरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश/विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
  • अकस्मात मृत्यूची खबर
  • एफ आय आर
  • इंनक्वेस्ट पंचनामा
  • वाहन चालविण्याचा वैध परवाना
  • मृत्यू दाखला
  • अपंगत्वाचा दाखला
  • घोषणापत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
  • अपघात घटनास्थळ पंचनामा
  • पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
  • वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • कृषी अधिकारी पत्र
  • औषधोपचाराचे कागदपत्र
  • डिस्चार्ज कार्ड

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज

सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत, प्रस्ताव अर्जासोबत अपघाताच्या प्रकारानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण कागदपत्रांची यादी त्रुटीपत्रकात नोंदवून, तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संगणक प्रणालीमध्ये पडताळणी करून नोंदवली जावी.

अपघातग्रस्ताच्या वयाच्या पडताळणीसाठी खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक आहे:

  • जन्मदाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • पारपत्र
  • निवडणूक ओळखपत्र (स्वयंसाक्षांकित)

जर वरील प्रमाणपत्रे उपलब्ध नसतील, तर विमा दावेदाराने किंवा कुटुंबातील सदस्याने अपघातग्रस्त खातेदाराच्या वयाबद्दल शपथपत्र दिल्यास ते ग्राह्य धरले जाईल.

विमा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका, राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेली प्रत
  • 7/12 उतारा किंवा 8-अ नमुन्यातील मुळ उतारा, ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव असावे
  • मृत्यु प्रमाणपत्र (स्वयंसाक्षांकित केलेली प्रत)
  • घटनास्थळ पंचनामा (स्वयंसांक्षाकीत केलेली प्रत)

प्रस्ताव प्राप्त झाल्यावर, तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मुळ कागदपत्रे तपासून, साक्षांकित प्रमाणपत्रे पडताळली जातील.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana in Marathi. 

(अ) अर्जदार. 

  • अपघात झाल्यानंतर त्वरित योजनेंतर्गत पूर्वसुचनापत्र/नोंदणी करीता विहित नमुन्यात – क्लेम फॉर्म भाग १ सोबत. वरील नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
  • तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार अपघाताचे पुराव्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव विमा संरक्षित कालावधीत सादर करावा.
  • लाभासाठीचा दावा शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.
  • अपघाताच्या स्वरूपानुसार अपघाताचे पुराव्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव विमा संरक्षित कालावधीत सादर करावा.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana-शासन निर्णयः-

१. “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना” या योजने अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून सरकारने रु. १७.४५ कोटी इतके अनुदान वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०२३ – २४ करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून प्रस्तुत खर्च खालील लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा आशी मान्यता-

३. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी संदर्भ क्र. (१) च्या शासन निर्णयात नमूद तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.

४. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील.

५. प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी सहाय्यक संचालक, लेखा -१, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना नियंत्रण अधिकारी, संबंधित जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

६. प्रस्तुत शासन निर्णय, नियोजन विभाग व वित्त विभागाने त्यांचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनुक्रमे अनौसं. क्रमांक ३१९/का.१४३१, दि.२८.०६.२०२३ व अनौसं. क्रमांक १८५/२०२३/व्यय-१, दि.०६.०७.२०२३ दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

७. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेताक क्र. २०२३०७२८१८२२२३३१०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येणार आहे.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 FAQs.

१. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे?
उत्तर: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे जी शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना अपघाताच्या घटनेत विमा संरक्षण प्रदान करते. या योजनेत अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

२. Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana या योजनेत कोण पात्र आहे?
उत्तर: या योजनेसाठी महाराष्ट्रातील १० ते ७५ वयोगटातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पात्र आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे आई-वडील, पती/पत्नी, मुलगा, आणि अविवाहित मुलगी यांचा समावेश आहे.

३. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कोणत्या प्रकारच्या अपघातांना संरक्षण दिले जाते?
उत्तर: या योजनेत अपघाती मृत्यू, दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी होणे या सर्व प्रकारच्या अपघातांना विमा संरक्षण दिले जाते.

४. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: या योजनेसाठी अर्जदाराने अपघातानंतर त्वरित विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म भाग १ सादर करावा. तसेच, अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे अपघात झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

५. Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ७/१२  उतारा, अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते, अपघाताची माहिती देणारे अहवाल, वाहन चालविण्याचा वैध परवाना (जर लागू असेल तर), मृत्यु प्रमाणपत्र, आणि अपंगत्वाचा दाखला यांचा समावेश आहे.

६. Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana या योजनेत किती नुकसान भरपाई दिली जाते?
उत्तर: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana योजनेंतर्गत अपघाती मृत्यू आणि दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास रु. २,००,०००/- नुकसान भरपाई दिली जाते. एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.१,००,०००/- नुकसान भरपाई दिली जाते.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana. 

ही माहिती देखील बघा.

महाराष्ट्र बाल संगोपन योजना-ऑनलाइन अर्ज,उद्देश,पात्रता,कागदपत्रे,संपूर्ण माहिती

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment