Aapli Chawdi – ५०% गाय – म्हैस गट वाटप अनुदान योजना २०२४ | Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana 2024

Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana 2024

Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana 2024: राज्यात दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहा/चार/दोन दुधाळ संकरित गायी/म्हशींचे गट वाटप करण्याच्या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र अंमलबजावणी योजनांच्या पूर्वीच्या शासन निर्णयांना मागे टाकून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सदर योजनेंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांमध्ये देशी गायींचा समावेश करण्याचा विषय शासनाच्या विचाराधीन होती.

या लेखात आपण “गाय म्हशी गट वाटप अनुदान योजना” ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही महत्वाची माहिती इतरांसोबत जरूर शेअर करा. 

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या शासकिय योजनांअंतर्गत सन २०२४ ते सन २०२५-२६ या ३ वर्षाकरिता पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या जिल्हयासाठी दुधाळ जनावरे (गायी म्हशींचा) पुरवठा करावयाची आहेत. यासाठी पुरवठादारांचे जिल्हानिहाय पॅनेल तयार करण्यात येत असुन इच्छुक पुरवठादाराकडुन दि. १६/०७/२०२४ ते दि. १७/०८/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची सविस्तर माहिती विभागाचे संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in यावर तसेच, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर व निम्नस्वाक्षरीतांचे कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. दुधाळ जनावरे (गायी म्हशींचा) पुरवठा करणारे इच्छुक पात्र व्यक्ती, संस्था इ. यांनी विहित नमुन्यामध्ये पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर जिल्हयाच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचेकडे अर्ज करावा.

गाय – म्हैस गट वाटप अनुदान योजना २०२४

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उप-भूखंडांतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या सहा/चार/दोन संकरित गायी/म्हशींचे गट वाटप करणे या योजना मध्ये देशी दुधाळ गाईचा समावेश आहे.

खालील दिलेल्या गायीचा यामध्ये समावेश आहे:-

  1. गीर
  2. सहिवाल
  3. रेड सिंधी
  4. राठी
  5. थारपारकर देवणी
  6. लाल कंधारी
  7. गवळाऊ
  8. डांगी

इत्यादी दुधाळ जातीच्या गायीच्या समावेश आहे.

Gai Mhais Gat Vatap Anudan योजनेत समाविष्ट असलेल्या गाय खालील प्रमाणे. 

या योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या दुधाळ संकरित गाई जसे की:-

  • एचएफ (प्रतिदिन १० ते १२ लि. दुध उत्पादन क्षमता)
  • जर्सी (प्रतिदिन १० ते १२ लि. दुध उत्पादन क्षमता)
  • गीर (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)
  • सहिवाल (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)
  • रेड सिंधी (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)
  • राठी (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)
  • थारपारकर (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)
  • देवणी (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)
  • लाल कंधारी (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)
  • गवळाऊ (प्रतिदिन ०५ ते ०७ लि. दूध उत्पादन क्षमता)
  • डांगी (प्रतिदिन ०५ ते ०७  लि. दूध उत्पादन क्षमता)
  • सुधारीत मुऱ्हा व जाफराबादी म्हशी (प्रतिदिन ०८ ते १० लि. दुध उत्पादन क्षमता)

दुसऱ्या/ तिसऱ्या वेतातील असाव्यात. दुधाळ गाई व म्हशी शक्यतो ०१ ते ०२ महिन्यापूर्वी व्यायलेल्या असाव्यात. Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana

Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana अनुदान. 

  • अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थीना ७५ टक्के सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना ६/४/२ दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना ५० टक्के  शासकीय अनुदान राहील.
  • खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित ५० टक्के रक्कम उभी करावी लागेल आणि अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वत: किंवा बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज रुपाने उभारावी लागेल.
  • बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या ( खुल्या प्रवर्गासाठी १० टक्के लाभार्थी हिस्सा आणि 40 टक्के बँक कर्ज आणि अनुसूचित जाती/ जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के बँकेचे कर्ज) लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana. 

Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana योजनेचा लाभ. 

या योजने अंतर्गत, सहा संकरित गायी/म्हशींच्या गटाची किंमत रु.३,३५,१८४ निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:-

अ.क्र. बाब किंमत रुपये
सहा संकरित गाई/ म्हशींचा गट प्रति गाय/ म्हैस रु.४०,०००/- प्रमाणे २,४०,०००
जनावरांसाठी गोठा ३०,०००
स्वयंचलित चारा कटाई यंत्र २५,०००
खाद्य साठविण्यासाठी शेड २५,०००
५.७५  टक्के (+१०.०३% सेवाकर) दराने तीन वर्षांचा विमा १५,१८४
एकूण:- ३.३५,१८४/- रुपये

वरीलप्रमाणे, या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना गटवाटप करताना ५० टक्के सबसिडी म्हणजेच रु. १,६७,५९२ रुपये,सामान्य श्रेणीतील लाभार्थ्यांना अनुमती आहे, तर ७५ टक्के अनुदान हे अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना २,५१,३३८ भेटणार आहे.

Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana लाभार्थी निवड व पात्रता. 

सर्वसाधारण वर्गातील तसेच अनुसूचित जाती/जमातींमधील लाभार्थींची निवड खालील घटकांमधून प्राधान्याने उतरत्या क्रमाने करावी.

खालीलप्रमाणे लाभार्थी व पात्रता दिलेली आहे.

  • महिला बचत गटातील लाभार्थी
  • अल्प भूधारक शेतकरी (०१ ते ०२ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
  • साधारणपणे गाय म्हशी गट वाटप योजनेची लाभार्थी निवड पात्रता दिलेली आहे.

साधारणपणे गाय म्हशी गट वाटप योजनेची लाभार्थी निवड पात्रता दिलेली आहे.

Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana निवड प्रक्रिया व अर्ज. 

  • जिल्हयासाठी अंतिम निवड करण्यात आलेल्या पूरवठादाराने रक्कम रू. ५००/- स्टॅम्प पेपरवर ३ वर्ष कालावधी करिता करारनामा करणे आवश्यक आहे.
  • पुरवठादाराने करारनामा करतेवेळी “Administrative Officer, Regional Joint Commissioner of Animal Husbandry, Pune Division, Pune” यांचे नावे रु. ५.०० लक्ष रकमेची ३ वर्ष कालावधीसाठी बँक ग्यारंटी देणे आवश्यक आहे.
  • पुरवठादारास लाभार्थ्याच्या पसंतीनुसार दुधाळ जनावरे खरेदी समिती सभासदांच्या उपस्थितीत विहित कालमर्यादेत दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
  • पुरवठा केलेली दुधाळ जनावर (गायी- म्हैस) दुधातील व प्रजननक्षम असणे आवश्यक आहे.
  • एखाद्या जिल्हयात नेमलेल्या पुरवठादार विहित कालमर्यादेत दुधाळ जनावरांचा पुरवठा केला नसल्यास अन्य जिल्हयातील पुरवठादाराकडुन दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येईल.Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana
  • दुधाळ जनावरांच्या खरेदीच्या वेळी बाजारामध्ये प्रत्यक्ष पुरवठादार उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • पराराज्यातुन दुधाळ जनावरांची खरेदी करण्याची आवश्यकत्ता भासल्यास इतर राज्यातुन दुधाळ जनावरे आणण्याची व्यवस्था पुरवठादारास स्वःखर्चाने करावी लागेल.
  • पुरवठादाराने विहित करण्यात आलेल्या कालावधीत दुधाळ जनावरे उपलब्ध करून न दिल्यास करारनामामध्ये नमुद केलेनुसार दंड आकारण्याची कार्यवाही करण्यात यावी.Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana
  • दुधाळ जनावरांची खरेदी करताना केंद्र / राज्य शासनाचे सर्व कर अदा करण्याची जबाबदारी पुरवठादार याची राहील.
  • दुधाळ जनावरांच्या खरेदी नंतर पुरवठादाराने बाजार पावती किंवा देयक हे प्रिंटेड स्वरूपाचे असणे आवश्यक आहे.

योजनेचा अर्ज सादर कुठे करावा ?

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावयाचा आहे. 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे. 

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) * सातबारा (अनिवार्य)

३) * ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) * आधारकार्ड (अनिवार्य )

६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत. 

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत.

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत. 

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत. 

FAQs

 

प्रश्न १ : Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana-गाय म्हैस गट वाटप अनुदान योजना काय आहे?
उत्तर: राज्यातील दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहा/चार/दोन संकरित गायी/म्हशींचे गट वाटप करण्याची ही योजना आहे. यामध्ये देशी गायींचा समावेश आहे आणि योजनेच्या अंतर्गत लाभार्थींना अनुदान दिले जाते.

प्रश्न २ : या योजनेचा उद्देश काय आहे?
उत्तर: दुग्धोत्पादन वाढवणे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न ३ : या योजनेत कोणकोणत्या गायींचा समावेश आहे?
उत्तर: गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ, डांगी अशा देशी गायींचा समावेश आहे. तसेच, HF, जर्सी, मुऱ्हा आणि जाफराबादी म्हशींचाही समावेश आहे.

प्रश्न ४ : अर्ज कोण करू शकतो?
उत्तर: महिला बचत गटातील सदस्य, अल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार या योजना अंतर्गत अर्ज करू शकतात.

प्रश्न ५ : अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२४ आहे.

प्रश्न ६ : Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana-अनुदान किती आहे?
उत्तर: अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थीना ७५% अनुदान मिळते, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना ५०% अनुदान मिळते.

प्रश्न ७ : पुरवठादारांची निवड कशी केली जाते?
उत्तर: पुरवठादारांची निवड जिल्हानिहाय पॅनेलद्वारे केली जाते. पुरवठादारांना ०३ वर्षांच्या करारनाम्यानुसार जनावरांचा पुरवठा करावा लागतो.

प्रश्न ८ : Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana-योजनेचा अर्ज सादर कुठे करावा?
उत्तर: अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावयाचा आहे.

प्रश्न ९ : अधिक माहितीसाठी कोणत्या वेबसाइटला भेट द्यावी?
उत्तर: अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana 2024
    Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana

👇ही माहिती योजना देखील बघा👇

विधिमंडळांच्या आमदारांना दर महिन्याला पगार किती मिळतो ?

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment