ड्रॅगन फ्रुट (कलम) लागवड योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज. Online Apply Dragon Fruit kalam lagavd yojana.
Dragon Fruit kalam lagavd yojana: ड्रॅगन फ्रूट (कलम) हे निवडुंग प्रजातीतील फळ असून त्यातील पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे या फळाला सुपरफ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. या फळामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखे विविध औषधी गुणधर्म आणि खनिजे अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे तग धरतात. या पिकाला किड आणि इतर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव एकदम नाहीच्या प्रमाणात असून हे पीक संरक्षणाचा खर्चही जास्त नाही. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत या पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थी पात्रता.
१) ड्रॅगन फ्रुट (कलम) लागवड योजने अंतर्गत लाभारत्याला लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.२० हेक्टर तरी जमीन असणे आवश्यक आहे.
२) जर या योजनेसाठी तुम्ही निवड झाल्यास लागणाऱ्या कागदपत्रांबरोबर तुमचे संमतीपत्र देणे बंधनकारक आहे.
योजने अंतर्गत अनुदान किती व कधी मिळते.
१) या योजने अंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या ४०% टक्के म्हणजेच कमाल रु.१.६० लाख इतके अनुदान प्रती हेक्टर मिळते.
२) हे अनुदान ३ टप्प्यांत कृषी अधिकारी मंडळाने केलेल्या मोका तपासणीनंतर दिले जाते. पहिल्या वर्षी ६०% टक्के, दुसऱ्या वर्षी २०% टक्के आणि तिसऱ्या वर्षी २०% टक्के अनुदानाचा निधी प्राप्त होतो.
३) हे संपूर्ण अनुदान मिळण्यासाठी दुसऱ्या वर्षी किमान ७५ टक्के आणि तीसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत ठेवणे बंधनकारक आहे.
योजनेचे अनुदान कोणत्या बाबींसाठी मिळते ?
- आधाराकरीता कॉक्रीट खांब उभारणे.
- खांब उभारण्यासाठी खड्डे खोदणे.
- खांबावर प्लेट लावणे.
- रोपे लागवड करणे.
- ठिबक सिंचन लाईनसाठी.
- खत व्यवस्थापन व पिकसंरक्षण.
योजने अंतर्गत एका लाभार्थीस किती क्षेत्रापर्यंत अर्ज करता येतो ?
- एक लाभार्थी किमान ०.२० हेक्टर आणि जास्तीत जास्त ४ हेक्टर पर्यंत लागवड करू शकतो आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.
लागवड काशी करावी व किती अंतरावर करावी ?
१) अर्ज केल्यानंतर, कृषी सहाय्यक अधिकारी जागेची पाहणी करतात. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पूर्व मंजुरी दिल्यानंतर एक महिन्याच्या आत लागवडीचे काम सुरू करावे. Dragon Fruit kalam lagavd yojana सदर लागवड ही लगतच्या क्षेत्रावर करणे बंधनकारक आहे. लागवडीसाठी ०.६०x०.६०x०.६० मीटरच्या आकाराचे खडड़े खोदणे आवश्यक आहे.
२) लागवडीसाठी ठिबक सिंचन करण हे बंधनकारक आहे.
३) लागवड ही प्रशासनाने सांगितलेल्या अटी शर्ती नुसार ४.८x३ मी. किंवा ३.५x३ मी. किंवा ३x३ मी. या अंतरावर करावी.
४) लागवड जर ४.५ x३ मी.अंतरावर केल्यास प्रती हेक्टरी २९६० रोपे, ३.५x३ मी. अंतरावर केल्यास प्रती हेक्टरी ३८०८ रोपे आणी जर लागवड ३x३ मी अंतरावर केल्यास हेक्टरी ४४४४ रोपे लागतात.
लागवडीसाठी लागणारी रोपे कुठून खरेदी करावीत ?
लागवडीसाठी लागणारी रोपे खालील ठिकाणा वरून शेतकऱ्यानी खरेदी करावीत.
- आपल्या तालुक्यातील कृषी विभागची रोपवाटीका.
- जिल्ह्याठिकाणी असलेल्या कृषी विद्यापीठाची रोपवाटीका.
- आयसीएआर (ICAR) संस्थेची नर्सरी, कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटीका.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीची रोपवाटिका.
- वरील ठिकाणी किंवा सामाजिक वनीकरण किंवा इतर शासकीय विभागाच्या रोपवाटिका उपलब्ध नसल्यास नोंदणीकृत व मान्यताप्राप्त खाजगी रोपवाटिका कडून खरेदी कराव्यात.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
- शेतीचा ७/१२ उतारा.
- अर्जदराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- ८ अ उतारा.
- जर ७/१२ सामायीक असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र.
- राष्ट्रीयीकृत बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स ( आधार लिंक असणे गरजेचे).
- आधार कार्ड.
- जातीचा दाखला (अजा व अज शेतकरी यांच्यासाठी).
- विहित नमुन्यातील हमी पत्र.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
online apply Dragon Fruit kalam lagavd yojana.
Dragon Fruit kalam lagavd yojana FAQs.
१. ड्रॅगन फ्रुट (कलम) लागवड योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे?
उत्तर – अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.२० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
२.Dragon Fruit kalam lagavd yojana- या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?
उत्तर – योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या ४०% म्हणजेच कमाल रु.१.६० लाख प्रती हेक्टर अनुदान मिळते.
३. अनुदान कधी आणि कसे मिळते?
उत्तर – अनुदान ३ टप्प्यांत दिले जाते: पहिल्या वर्षी ६०%, दुसऱ्या वर्षी २०%, आणि तिसऱ्या वर्षी २०%.
४. लागवडीसाठी आवश्यक रोपे कुठून खरेदी करावीत?
उत्तर – रोपे तालुक्यातील कृषी विभाग, जिल्ह्याठिकाणी असलेल्या कृषी विद्यापीठ, आयसीएआर संस्थेची नर्सरी, आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ग्रामपंचायतीच्या रोपवाटिका यांच्याकडून खरेदी करावीत.Dragon Fruit kalam lagavd yojana.
५. लागवड करण्यासाठी कोणते अंतर राखावे?
उत्तर – लागवडीसाठी प्रशासनाने सांगितलेल्या अटी शर्ती नुसार ४.८x३ मी. किंवा ३.५x३ मी. किंवा ३x३ मी. या अंतरावर करावी.
६. लागवड किती क्षेत्रापर्यंत करता येते?
उत्तर – किमान ०.२० हेक्टर आणि जास्तीत जास्त ४ हेक्टर पर्यंत लागवड करू शकता आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकता.
७. अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर – शेतीचा ७/१२ उतारा, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, ८ अ उतारा, इतर खातेदारांचे संमतीपत्र, राष्ट्रीयीकृत बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड, जातीचा दाखला (अजा व अज शेतकरी यांच्यासाठी), आणि विहित नमुन्यातील हमी पत्र आवश्यक आहे.
८. लागवड केल्यानंतर किती काळात काम पूर्ण करावे लागते?
उत्तर – अर्ज केल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पूर्व मंजुरी दिल्यानंतर एक महिन्याच्या आत लागवडीचे काम सुरू करावे.
👇ही माहिती योजना देखील बघा👇
५०% गाय – म्हैस गट वाटप अनुदान योजना २०२४ | Gai Mhais Gat Vatap Anudan Yojana 2024
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.