Salary Account Benefits.
नमस्कार मित्रांनो, पगार खाते (Salary Account Benefits) ह्याचा आज अभ्यास करूया, पगार खाते म्हणजेच सॅलरी अकाउंट धारक असलेले सरकारी आणि निमसरकारी कर्मच्यारी असलेल्या केवळ १०% लोकांनाच त्याचे फायदे माहित असतील. चला तर आपण या सॅलरी अकाऊंट चे काय काय फायदे आणि विविध प्रकार सविस्तर माहिती पाहूया.
सॅलरी अकाऊंट कोण उघडू शकते खाते ?
सरकारी व खाजगी नोकरी करणारा कोणताही भारतीय नागरिक, केलेल्या कामा बदल्यात दरमहा किमान १० हजार रुपये कमवत आहे, तो सॅलरी अकाऊंट उघडू शकतो.
तुम्ही SBI सॅलरी अकाऊंट हे ऑनलाइन देखील उघडू शकता.यासाठी तुम्हाला एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.किवा तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये योनो एप डाउनलोड करून देखील सॅलरी अकाऊंट उघडू शकता पण एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बॅंक शाखेत जावे लागते.
कर्मचाऱ्यांचे पगार खाते कोणत्या बँकेत असावे? यासंदर्भात शासनाचा कोणताही शासन निर्णय नाही किंवा महाराष्ट्र शासनाने देखील असा कोणता निर्णय काढलेला नाही.प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते.
राज्य सरकारचे वेतन पॅकेज – Salary Account Benefits State Government salary package.
Salary account पगार खात्याचे एकूण ९ प्रकार आहेत. त्यापैकी SGSP खात्याचे (account) ४ प्रकार आहेत.या प्रत्येक प्रकारांमधील फरक कर्मचाऱ्यांच्या पदनाम(Designation) आणि निव्वळ मासिक उत्पन्नावर(Net monthly income)आधारित आहे.
SGSP खात्याचे ४ प्रकार.
- प्लॅटिनम :- ज्या कर्मचाऱ्यांचे एकूण मासिक वेतन हे १ लाख किंवा त्याहून अधिक आहे,अशांना बँकेकडून प्लॅटिनम खात्याची ऑफर दिली जाते.
- डायमंड :- सॅलरी अकाउंट खात्याचा ह्या प्रकारात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बँकेकडून डायमंड खात ऑफर केला जातो, ज्यांचे मासिक वेतन हे रु.५०,००१ ते रु.१,००,००० लाख दरम्यान आहे.
- गोल्ड :- सॅलरी अकाउंट चा लाभ ह्या प्रकारात २० हजार ते ५० हजार दरम्यान मासिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेकडून गोल्ड खात दिला जातो.
- सिल्व्हर :- सॅलरी अकाउंट चा लाभ ह्या प्रकारात रु.५,००० ते रु.२०,००० हजार दरम्यान पगार आहे.अशा कर्मचाऱ्यांना बँकेकडून सिल्व्हर खात्याचा लाभदिला जातो.
CSP खाते प्रकार (CSP Account Types).
निमसरकारी सॅलरी पॅकेज प्रकारातल्या पगार खात्याची पात्रता कर्मचाऱ्यांच्या निव्वळ मासिक वेतनावर अवलंबून आहे.
- प्लॅटिनम : वरील १,००,०००/-
- डायमंड : ५०,०००/- च्या वर आणि १,००,०००/- पर्यंत.
- गोल्ड : २५,०००/- च्या वर आणि ५०,०००/- पर्यंत.
- सिल्व्हर : १०,०००/- दरम्यान आणि २५,०००/- पर्यंत.
सॅलरी अकाउंटचे काय आहेत फायदे ?
झिरो बॅलेन्सची सुविधा.
- सॅलरी अकाउंटचा सर्वात पहिला Salary Account Benefits फायदा म्हणजे या खात्यावर तुम्हाला झिरो बॅलेन्सची सुविधा मिळते. तीन महिने तुमच्या खात्यात शून्य शिल्लक राहिल्यास बँक तुमच्याकडून कोणताही दंड आकारणार नाही. पण सामान्य बचत खात्यात किमान शिल्लक राखून ठेवणे फार महत्वाचे असते नाहीतर दंड भरावा लागतो.
मोफत ATM व्यवहार.
- अनेक बँका सॅलरी खात्यावर मोफत एटीएम व्यवहाराची सुविधा देतात. यामध्ये एसबीआय, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी आदी बँकांचा समावेश आहेत. अशा स्थितीत तुम्ही एका Salary Account Benefits महिन्यात असंख्य वेळा एटीएम व्यवहार करू शकता. यासोबतच सॅलरी खात्याच्या एटीएमवर कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जात नाही.
संपत्ती सॅलरी खाते.
- जर तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्ही वेल्थ सॅलरी अकाउंट देखील उघडू शकता. या प्रकारच्या खात्यात, बँक तुम्हाला एक समर्पित संपत्ती व्यवस्थापक देते, जो बँकेशी संबंधित तुमचे सर्व काम पाहतो.
लॉकर चार्जेसवर सूट.
- अनेक बँक सॅलरी खात्यावरील लॉकर शुल्क आकारत नाही. देशाची सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकेबद्दल बोलायचे तर तुम्हाला बँक सॅलरी अकाउंटवर लॉकर शुल्कावर २५% पर्यंत सूट मिळते, पण जर तुमच्या बँकेला कळले की काही काळ तुमच्या खात्यात पगार येत नाही, तर तुम्हाला दिलेल्या सर्व सुविधा काढून घेतल्या जातील. अशा स्थितीत तुमचे सॅलरी खाते Salary Account Benefits सामान्य बचत खात्याप्रमाणे सुरू ठेवले जाते.
इतर सुविधा.
- तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.आपल्या सॅलरी अकाउंटला शिल्लक नसतानाही तुम्ही २ पगाराइतके पैसे काढू शकता.
- सॅलरी अकाऊंटसोबत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील बँकेकडून ऑफर केले जाते . याशिवाय चेक आणि डिजिटल बँकिंगचे सर्व फायदेही सदर बँक उपलब्ध करून देते.
- तुमचे सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्हाला लॉकर सुविधेवर २५% सूट बँकेकडून ऑफर केले जाते.
- सॅलरी अकाऊंट सोबत, हे तुम्हाला डिमॅट अकाउंटची सुविधा देखील देते, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता.
- सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. बँक कर्ज प्रक्रिया शुल्कावर ५०% सूट देखील देते.
- बँक आपल्या सॅलरी अकाऊंट ग्राहकांना विमा लाभ देखील देते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- तुमच्या पगारानुसार बँकेकडून ३० लाख रुपयांपर्यंत विमा कव्हरेज भेटू शकतो.
- तुमचे सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएममधून (ATM) तुम्हाला हवे तितक्या वेळा मोफत पैसे काढू शकता.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे शून्य शिल्लक असतानाही पगार खाते उघडता येते. शिल्लक शून्यावर गेल्यास तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
जर तुमचा मासिक पगार २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एसबीआयमध्ये खाते देखील उघडू शकता. अशा सॅलरी अकाऊंट ग्राहकांसाठी एसबीआय रिश्ते योजना खूप उपयुक्त आहे.Salary Account Benefits.
सूचना: Salary Account Benefits वरील सदर दिलेली सर्व माहिती ही प्रतेक बँकेची वेग वेगळी नियम अटी शर्तीसह असू शकते.
Salary Account Benefits Information In Marathi 2024 FAQs.
१. सॅलरी अकाउंट म्हणजे काय?
उत्तर: सॅलरी अकाउंट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगार जमा करण्यासाठी बँकेत उघडलेले खाते. हे खाते शून्य शिल्लक सुविधेसह येते आणि यामध्ये बँक अनेक प्रकारच्या विशेष सेवा व सवलती देते.
२. सॅलरी अकाउंट उघडण्यासाठी कोण पात्र आहे?
उत्तर: सरकारी व खाजगी नोकरी करणारा कोणताही भारतीय नागरिक, ज्याचे मासिक वेतन किमान 10,000 रुपये आहे, तो सॅलरी अकाउंट उघडू शकतो.
३. सॅलरी अकाउंट उघडल्यावर कोणकोणत्या सुविधा मिळतात?
उत्तर: सॅलरी अकाउंट धारकांना शून्य शिल्लक सुविधा, मोफत एटीएम व्यवहार, ओव्हरड्राफ्ट सुविधा, क्रेडिट कार्ड, विमा कव्हरेज, लॉकर चार्जेसवर सवलत, डिमॅट अकाउंट सुविधा, आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते.
४. सॅलरी अकाउंटवर लॉकर चार्जेसवर किती सूट मिळते?
उत्तर: एसबीआय सारख्या काही बँकांमध्ये सॅलरी अकाउंटवर लॉकर शुल्कावर 25% पर्यंत सूट मिळते.
५. सॅलरी अकाउंट उघडताना Salary Account Benefits कोणतीही अर्ज फी भरावी लागते का?
उत्तर: नाही, सॅलरी अकाउंट उघडताना कोणतीही अर्ज फी लागणार नाही, तसेच या खात्याला शून्य शिल्लक सुविधा देखील मिळते.
Salary Account Benefits Information in marathi.
ही माहिती देखील बघा.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रुपये; असा करा अर्ज
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥