Toilet Subsidy Scheme Maharashtra 2024 : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म सुरु; नागरिकांना मिळणार १२,००० रुपये, असा करा ऑनलाइन अर्ज..,

Toilet Subsidy Scheme Maharashtra. 

नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात शौचालयांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. अनेक कुटुंबांना शौचालय अनुदान मिळाले आहे. मात्र, जे कुटुंब शौचालयाच्या लाभापासून वंचित आहेत, ते “Sauchalay Online Registration” या प्रक्रियेअंतर्गत शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात, राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

Toilet Subsidy Scheme Maharashtra या योजनेअंतर्गत, राज्यातील नागरिकांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी १२,०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यात केंद्र सरकारचा ७५% (९,०००/- रुपये) आणि राज्य सरकारचा २५% (३,०००/- रुपये) असा वाटा असतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sauchalay Anudan Yojana 2024 Online Registration. 

Toilet Subsidy Scheme Maharashtra: काही नागरिक नदीच्या किनाऱ्यावर शौचास बसतात, त्यामुळे सर्व घाण नदीत जाऊन पाणी दूषित होते. हे दूषित पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात, ज्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांच्या या समस्यांचा विचार करून त्यांना या सर्व समस्यांपासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाला व राज्याला स्वच्छ बनवण्यासाठी, आणि नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करण्यासाठी राज्यात शौचालय अनुदान योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Toilet Subsidy Scheme Maharashtra या योजनेअंतर्गत, लाभार्थी कुटुंबांना स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२,०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते, आणि ही रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असल्यामुळे, त्यांच्याकडे उत्पन्नाचा किंवा रोजगाराचा स्थायी स्रोत उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते, आणि त्यांना स्वतःचे शौचालय बांधणे शक्य नसते. त्यामुळे, हे कुटुंबे खुल्यावर शौचास बसतात, ज्यामुळे परिसरात घाण निर्माण होते, दुर्गंधी पसरते, आणि माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, परिसरात रोगराई पसरते आणि लोक आजारी पडतात. Swachh Bharat Mission Gramin toilet online apply या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील नागरिकांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करून, त्यांना उघड्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करणे आणि स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे.

या लेखात आम्ही शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, तसेच यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, याची सविस्तर माहिती दिली आहे.

घरगुती शौचालय असो किंवा सामुदायिक शौचालय बांधताना, भूजल आणि जलस्त्रोत दूषित होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना SBM(G) फेज-II चे उद्दिष्टे. 

  • गावे, ग्रामपंचायती, ब्लॉक, जिल्हे आणि राज्यांनी ODF (Open Defecation Free) स्थिती कायम ठेवणे.
  • नागरिक बांधलेल्या शौचालयांचा नियमित वापर करतात आणि सुरक्षित व आरोग्यदायी वर्तन करतात याची खात्री करणे. 
  • ग्रामीण भागात एकूणच स्वच्छतेसाठी गावांना SLWM (Solid and Liquid Waste Management) व्यवस्थेची उपलब्धता सुनिश्चित करणे. 
  • ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे.

शौचालय अनुदानासाठी खालील व्यक्ती पात्र असतील? Toilet Subsidy Scheme Maharashtra eligibility

  • सर्व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (BPL)
  • दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे (APL): यामध्ये घरकुल असलेले भूमिहीन मजूर, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी, शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती, महिला प्रमुख असलेली कुटुंबे इ. योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

वैयक्तिक शौचालय ऑनलाईन अर्ज? how to apply for Toilet Subsidy Scheme Maharashtra

जे कुटुंब वैयक्तिक शौचालय लाभास पात्र असतील ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

अ.क्र प्रकार वेबसाईट
१) योजना केंद्र शासन
२) लाभार्थी व्यक्ती APL & BPL लाभार्थी
३) अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन/Online
४) मुख्य संकेस्थळ https://sbm.gov.in/

sbm.gov.in online registration

वेबसाईट : ttps://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx

किंवा

नोंदणी करिता : https://sbm.gov.in/SBM_DBT/Secure/DBT/DBT_Registration.aspx

  • सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी नोंदणी वेबसाईट चा वापर करावा.
  • नोंदणी करीता आपला मोबाईल नंबर,संपूर्ण नाव,रहिवाशी पत्ता,राज्य इ. थोडक्यात माहिती द्यावी लागेल.
  • नंतर CAPTCHA कोड भरावा लागेल. नंतर Submit बटन वरती क्लिक करा.
  • आपल्या समोर पॉप-अप मध्ये एक मेसेज पाहायला मिळेल. कि आपला पासवर्ड मोबाईल नंबर वरती पाठविला आहे.परंतु मित्रांनो हा पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार (४) अंक टाकायचे आहेत.(ग्रामपंचायत योजनांची यादी पहा)
  • पुन्हा साईन-इन या पेज वरती तुम्हाला यायचं आहे. येथे तुम्ही मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरचे शेवटचे अंक पासवर्ड म्हणून टाकायचे आहेत. खालील कोड भरून Sign In वरती क्लिक करा.
  • पुन्हा एक नवीन पेज सुरु होईल. यामध्ये जुना पासवर्ड टाकून तुम्हाला नवीन पासवर्ड बनवावा लागेल.
  • New Application वरती क्लिक करा.

Section A :

  • आपले राज्य,जिल्हा,तालुका,गाव,वस्ती निवडा.

Section B : वैयक्तिक माहिती.

  • आधार कार्डनुसार नाव.
  • आधार कार्ड नंबर भरा.
  • Verify Aadhaar Number वरती क्लिक करा.
  • वडिलांचे नाव,APL/BPL,Sub Category,मोबाईल नंबर,ई-मेल,पत्ता इ.माहिती भरा.

Section C : बँकेची माहिती

  • सर्वात आधी IFSC कोड भरा, पासबुक वरील नाव, बँकेची शाखा/पत्ता,खाते नंबर भरा.
  • Scans/स्कॅन केलेले बँक पासबुक अपलोड करा.
  • Apply बटन वरती क्लिक करा.
  • आपल्याला एक Application नंबर मिळेल. हा नंबर लिहून घ्या किंवा प्रिंट करून ठेवा.
  • Application नंबर वरून आपण केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतो.

वरील स्टेप फॉलो करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता. 

Toilet Subsidy Scheme Maharashtra 2024 FAQs.

१. शौचालय अनुदान योजनेचा लाभ कसा मिळवू शकतो?
उत्तर: शौचालय अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र कुटुंबांनी “Sauchalay Online Registration” प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आवश्यक माहिती भरून, संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

२. Toilet Subsidy Scheme Maharashtra या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना किती आर्थिक सहाय्य मिळते?
उत्तर: शौचालय अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२,०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. यात केंद्र सरकारचा ७५% (९,०००/- रुपये) आणि राज्य सरकारचा २५% (३,०००/- रुपये) वाटा असतो.

३. शौचालय अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे?
उत्तर: दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (BPL) आणि दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे (APL) जसे की घरकुल असलेले भूमिहीन मजूर, अनुसूचित जाती/जमाती, लहान शेतकरी, शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती, महिला प्रमुख असलेली कुटुंबे इ. पात्र आहेत.

४. शौचालय अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
उत्तर: शौचालय अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://sbm.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागते. त्यानंतर अर्जास आवश्यक माहिती भरून, बँकेची माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागतो.

५. Toilet Subsidy Scheme Maharashtra साठी अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
उत्तर: अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आणि गाव, तालुका, जिल्ह्याची माहिती यांचा समावेश आहे.

Toilet Subsidy Scheme Maharashtra

Toilet Subsidy Scheme Maharashtra. 

ही माहिती देखील बघा.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रुपये; असा करा अर्ज

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment