Aapli Chawdi: Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रुपये; असा करा अर्ज

Mukhyamantri Vayoshri Yojana. 

नमस्कार मित्रांनो- सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी आहे. त्यापैकी, त्यापैकी सद्यस्थितीत ६५ वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण १०-१२ टक्के ज्येष्ठ नागरिक (१.२५ – १.५० कोटी) आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो.

ही सदर बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील संबंधित दिव्यांग/दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यक साधने/उपकरणे प्रदान करण्यासाठी वयोश्री योजना सुरू केली आहे. त्यानुसार, अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि त्यांना गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे तसेच मानसिक आरोग्य केंद्रे, योग चिकित्सा केंद्रे इत्यादी प्रदान करून त्यांचे मानसिक आणि कौटुंबिक आरोग्य अबाधित ठेवून, ही बाब वयोगटासाठी अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्याचा विचार सरकारच्या विचाराधीन होता.

मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये ! Mukhyamantri Vayoshri Yojana. 

राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुसंवाद साधण्यासाठी आणि वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मनःस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रे इत्यादींमधून त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राज्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे, ही योजना मंत्रिमंडळाच्या मान्यतेने कार्यान्वित केली जात आहे.

योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना
सुरू करणार महाराष्ट्र शासन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे
योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत
लाभस्वरूप एकरकमी ३,००० रु.
लाभार्थी राज्यातील ज्येष्ठ नागरिक
वयोमर्यादा ६५ वर्षांपेक्षा जास्त
अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन
शासन निर्णय येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Mukhyamantri Vayoshri Yojana-योजनेचे ध्येय व उद्दिष्ट:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुसंगतपणे जगण्यासाठी आणि वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रे इत्यादींमधून त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ हस्तांतरण (D.B.T) प्रणालीद्वारे एकवेळ एकरकमी रु. ३०००/- ची मदत प्रदान केली जाईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana-योजनेचे स्वरूप:

सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/+ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/ उपकरणे खरेदी करता येतील.

उदा:-

  • चष्मा
  • श्रवणयंत्र
  • ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नि-बेस
  • लंबर बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर इ.

तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.

निधी वितरण/अर्थसहाय्य:

(i) राज्य शासनातर्फे १००% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.

(ii) थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणाली द्वारे रु.३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.

(iii) शिबीराचे आयोजन करणे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या प्रत्येक भागात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग) आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि स्क्रिनिंग केले जाते. Vayoshri yojana in marathi याप्रमाणे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेद्वारे या विभागाच्या सर्वेक्षणासोबतच या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल.

लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, दस्तावेजांची हाताळणी, कागदपत्रांची तपासणी, आणि त्यांना थेट लाभ (D.B.T.) प्रणालीद्वारे वितरित करणे, तसेच लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्राचे वाटप करणे या सर्व गोष्टींसाठी प्रती लाभार्थी सुमारे रु. २००/- खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?

  • आधारकार्ड / मतदान कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स
  • स्वयं-घोषणाफत्र
  • शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पात्रता निकष काय?

  • लाभार्थ्याने ३१ डिसेंबर, २०२३ अखेर वयाची ६५ वर्षे पुर्ण केलेली असावीत.
  • लाभार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डची पावती देखील चालणार आहे.
  • आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे.
  • लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत किवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

Mukhyamantri Vayoshri Yojana Form. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. (मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा फॉर्म येथे डाउनलोड करा) हा फॉर्म व्यवस्थित भरून. ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सबमिट करा.

फॉर्ममध्ये पासपोर्ट साईज फोटो चिकटवा. आणी तुमचे संपूर्ण नाव, तुमचे वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणी विचारलेली ईतर माहिती भरा.

तुम्हाला मागील तीन वर्षांत तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे. फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा.

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठीचा ऑफलाइन अर्ज (PDF) येथे क्लिक करा. 
मुख्यमंत्री वयोश्री official website. 

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online Website.

येथे क्लिक करा. 
Online Apply येथे क्लिक करा. 
मुख्यमंत्री वयोश्री योजना (GR) येथे क्लिक करा. 

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग:

राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देणे बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी पात्र अर्जदारांनी समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ ईमेल-acswopune@gmail.com) वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 FAQs.

१. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश काय आहे?
उत्तर: मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश राज्यातील ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत प्रदान करणे आणि त्यांना सहाय्यभूत साधने/उपकरणे खरेदी करण्यास मदत करणे आहे, ज्यामुळे ते दैनंदिन जीवनात सुसंवाद साधू शकतील आणि वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करू शकतील.

२. Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना किती रक्कम मिळते?
उत्तर: मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना थेट लाभ हस्तांतरण (D.B.T) प्रणालीद्वारे एकवेळ एकरकमी रु. ३०००/- ची मदत दिली जाते.

३. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने भरता येतो. अर्जदारांनी आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करावा.

४. Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेअंतर्गत कोणकोणती साधने/उपकरणे दिली जातात?
उत्तर: मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-बेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी सहाय्यभूत साधने/उपकरणे दिली जातात.

५. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता काय आहे?
उत्तर: मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता निकषांमध्ये लाभार्थ्याने ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत ६५ वर्षे वय पूर्ण केलेले असावे, लाभार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा इतर पात्रता पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

६. Mukhyamantri Vayoshri Yojana योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
उत्तर: मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधारकार्ड/मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स, स्वयं-घोषणापत्र, आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे यांचा समावेश आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana. 

ही माहिती देखील बघा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना – ऑनलाइन,अर्ज,उद्देश,पात्रता,कागदपत्रे,संपूर्ण माहिती

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment