Aapli Chawdi – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana information in Marathi | 436 रुपये भरा आणि मिळवा 2,00,000 /- रुपये

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana information in Marathi.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: केंद्र सरकारने भारतात वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती ही योजना गोर गरीब आणि आर्थिक उत्पन्न कमी असण्यार्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही जीवन विमा योजना आहे. (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana).कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराच्या काळात आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून हेच उद्दिष्टडोळ्या समोर ठेऊन मोदी सरकारने सुरू केलेली सगळ्यात स्वस्त योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना (PMJJBY) आपल्यासाठी उत्तम आहे. ह्या योजने बद्दल पुढे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नक्की काय आहे ? जीवन विमा योजना माहिती ? | PMJJBY Information in Marathi.

भारत सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योति Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana ही योजना ९ मे २०१५ मध्ये चालू करण्यात आली. ही योजना एक मुदत विमा योजना आहे. ह्या योजनेमध्ये लाभार्थीला २,००,०००/- लाख रुपये लाईफ कव्हर विमा मिळतो.

ही विमा योजना नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास २,००,०००/- लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण प्रदान करते. यामध्ये वय वर्ष १८ ते ५० या वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या योजनेत सहभागी होणाऱ्या पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना २,००,०००/- लाख रुपयांची भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता हे रु.४३६ रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष आहे.या विमा योजनांमध्ये नागरिक फक्त रु.४३६ च्या अत्यंत कमी वार्षिक हप्त्या मध्ये सहभागी होऊ शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ह्या जीवन ज्योति विमा योजनेत आपल्याला प्रत्येक वर्षी योजनेच्या हप्त्याची रक्कम भरावी लागते किंवा जर आपल्या बँक खात्यात पुरेशी रक्कम असल्यास आपल्या खात्यातून विम्याची रक्कम ही ऑटो डेबिट म्हणजे (स्वयं-डेबिट) केली जाते. ज्यावेळी विमाधारकाचा मृत्यू होईल त्यावेळी विमाधारकाच्या कुटुंबाला प्रमुख व्यक्तीला ते विम्याचे २,००,०००/- लाख रुपये मिळतात.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचे फायदे | Benefits of Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana. 

या योजने अंतर्गत विमा धारकाचा कोणत्याही प्रकारे (नैसगिक किंवा अपघाती) मृत्यू झाल्यास वारसदाराला किंवा कुटुंबाला २,००,०००/- लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.

योजनेत सहभागी झालेल्या त्या व्यक्तीचे वय वर्ष १८ ते ५५ असेल (त्यापेक्षा जास्त नसावे) वरील कोणत्याही कारणाने विमा धारकाचा मृत्यू झाला असेल तरच त्या व्यक्तीच्या वारसास २,००,०००/- लाख रुपये रक्कम मिळेल. म्हणजेच हि योजना वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत विमा कव्हर देते.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना साठी पात्रता | Eligibility For Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana. 

  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना साठी (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणता व्यक्ती पात्र असेल ते आपण जाणून घेऊ या.
  • ह्या योजनेत ज्याचे वय १८ ते ५५ पर्यंत आहे. ते लोक ह्या योजनेसाठी पात्र आहेत.
  • ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत आपले सेविंग खाते असणे आणि त्या सेविंग खात्याला आधार,मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे असते.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना साठी अर्ज कसा करावा/केला जातो? | How to Apply for Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana. 

ज्यांना लोकांला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपल्या मोबाइल वरुण इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येतो.

आपण जर इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकत नसाल तर काही हरकत नाही आपण आपल्या नजीकच्या बँकेत शाखेत जाऊन अर्ज करू शकता. तसेच ह्या योजनेचा ऑनलाईन अर्ज (PMJJBY PDF Form) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

Pradhan mantri jeevan jyoti bima yojana in marathi form

PMJJBY PDF Form अर्ज डाऊनलोड करा 👉(Click here)

नोंदणी कालावधी आणि वेळ.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२३ या ०५ महिन्यांच्या कालावधीत, जिल्हा प्रशासन, जिल्हा बँक म्हणजेच बँक ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने, आपल्या जिल्हातील, इतर सर्व खाजगी बँका, कोल्हापूर आणि बारामती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामपंचायत प्रशासनामार्फत मोहीम राबविण्यात येत आहे.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana आवश्यक लागणारी कागदपत्रे. 

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक अकाउंट पासबुक (बँक अकाउंट ला आधार लिंक असणे महत्त्वाचे)
  • आधार लिंक मोबाईल नंबर
  • अर्ज दारचा पासपोर्ट साईज फोटो
  • मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड

योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदारणी बँक पासबुक आणि आपले केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील. तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांसह शिबिराला भेट देऊन आपले नाव नोंदणी करावी. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि सुरक्षा विमा योजनेचा कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे पर्यंत असतो.या योजनेला वार्षिक नूतनीकरण आवश्यक आहे आणि एकदा नोंदणी केल्यानंतर दरवर्षी विमा प्रीमियम ऑटोडेबिट करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर काही अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसीच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर ती पॉलिसी पुन्हा पुनरुज्जीवित केली जाऊ शकते. शिबिरातील कागदपत्रांसह संपूर्ण अर्जावर बिझनेस कोऑर्डिनेटर (बीसी) मशीनद्वारे या योजनांमध्ये त्वरित ऑनलाइन नोंदणीची सुविधा देखील प्रदान केली जाते.

जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी तसेच SFG मधील महिलांनी योजनांमध्ये १००% नावनोंदणी करावी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही ह्या योजने मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी रु.४३६ रुपये ईतके वार्षिक प्रीमियम भरू या आणि योजने मध्ये सहभागी होऊ या.. आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करूया..

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा हफ्ता | Premium of Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana. 

  • या योजनेचा वार्षिक हफ्ता हा रु.४३६ रुपये ईतका असून आपण अर्ज केल्यानंतर तो आपल्या खात्यातून वजा केला महणजेच ऑटो डेबिट जातो. हि सेवा वय वर्ष १८ ते ५५ वर्षामधील लोकांसाठी असते.
  • रु. ४३६ हि हफ्ताची रक्कम दरवर्षी मे महिन्यामध्ये आपो आप (Auto Debit) म्हणजे आपल्या खात्यातून कमी केली जाते. त्यामुळे मे महिन्याच्या सुरवाती तारखे पासून ते शेवटच्या तरखे पर्यंत आपल्याला आपल्या खात्यामध्ये हप्त्याची रु.४३६ ही रक्कम शिल्लक ठेवावी लागते.
  • जर मे महिन्याच्या सुरवाती तारखे पासून ते शेवटच्या तरखे पर्यंत आपल्या खात्यामध्ये हप्त्याची रु.४३६ रुपये ही रक्कम शिल्लक नसेल तर आपला विमा आपोआप बंद होईल. याची काळजी घ्यावी.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसंबंधीत आधिक माहिती आपणाला कुठे मिळेल? | Information about PMJJBY

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने बद्दल Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana आपल्याला कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना टोल फ्री हेल्पलाइन नंबर दिले आहे. आधिक माहितीसाठी www.jansuraksha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती घेता येईल किंवा National Toll Free Number 1800-180-1111/ 1800-110-001 या नंबर वरती संपर्क साधता येईल.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana information in Marathi
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana information in Marathi

Aapli Chawdi Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana information in Marathi FAQs.

१. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना म्हणजे काय?
उत्तर: प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक जीवन विमा योजना आहे, ज्यामध्ये १८ ते ५० वर्षे वयोगटातील लोकांना कमी दरात विमा संरक्षण दिले जाते.

२. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana मिळणारे कव्हर किती आहे?
उत्तर: या योजनेअंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला २,००,०००/- रुपये विमा कव्हर मिळते.

३. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कोण पात्र आहेत?
उत्तर: १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेत सहभागी होता येते. अर्जदाराचे बँक सेविंग खाते असणे आवश्यक आहे.

४. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक हप्ता किती आहे?
उत्तर: प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक हप्ता फक्त रु. ४३६/- आहे, जो ऑटो डेबिटद्वारे खात्यातून दरवर्षी मे महिन्यात वजा केला जातो.

५. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना कोणत्या बँकेतून घेतली जाऊ शकते?
उत्तर: प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना कोणत्याही राष्ट्रीयकृत, खाजगी, सहकारी बँकेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून घेता येते.

६. Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana या योजनेचा लाभ कधीपर्यंत मिळतो?
उत्तर: योजनेत सहभागी झाल्यानंतर विमा कव्हर ५५ वर्षांपर्यंत मिळते. दरवर्षी हप्ता भरून योजना नूतनीकरण करावी लागते.

७. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्जदार आपले बँक खाते असलेल्या बँकेत जाऊन अर्ज करू शकतो किंवा इंटरनेट बँकिंग/मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतो.

८. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना कशा प्रकारच्या मृत्यूला कव्हर करते?
उत्तर: ही योजना नैसर्गिक मृत्यू आणि अपघाती मृत्यू दोन्ही प्रकारच्या मृत्यूला कव्हर करते.

९. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना रद्द केल्यास पैसे परत मिळतात का?
उत्तर: नाही, या योजनेत रद्द केल्यावर प्रीमियम परत मिळत नाही.

१०. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेची Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana अधिक माहिती कुठे मिळेल?
उत्तर: अधिक माहितीसाठी www.jansuraksha.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा टोल-फ्री क्रमांक 1800-180-1111/1800-110-001 वर संपर्क साधा.

ही माहिती देखील बघा.

E Pik Pahani Online Registration Information Maharashtra
E Pik Pahani Online Registration Information Maharashtra

ई पीक पाहणी नोंदणी 2024 | आजच करा पीक पाहणी अन्यथा होईल खूप मोठे नुकसान

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

aaplichawdi Google News

aaplichawdi telegram channel

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment