Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government | वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ! मृतांच्या वारसांना मिळणार 25 लाख रूपये, राज्यशासनाचा मोठा निर्णय !

Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government. 

The heirs of those killed in wild animal attacks will get Rs. 25 lakhs. 

सर्वांना नमस्कार मंडळी,राज्य सरकारचा वन विभागामार्फत सगळ्यात मोठा निर्णय. जसं की तुम्ही ऐकलं असेल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डोंगर भागात भरपूर गावे आहेत त्या गावात जंगली प्राण्यांपासून किती लोकांना धोका असतो त्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात कधीकधी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. त्याबद्दल त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई भेटत नाही परंतु या वर्षी सरकारने या मृत लोकांच्या वारसांना २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरवले आहे हीच माहिती आपण या लेखात संपूर्ण सविस्तरित्या पाहणार आहोत. 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ! मृतांच्या वारसांना मिळणार २५ लाख रूपये. 

Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government: वन्य प्रास त्याच्या ण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास, (The heirs of those killed in wild animal attacks will get Rs. 25 lakhs) कायमचे अपंगत्व आल्यास किंवा गंभीर व किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत भरीव वाढ करण्यात आली आहे. या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावारसांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत केली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुनगंटीवार यांनी याबाबतचे निवेदन सादर करताना सांगितले की, राज्यात वन्य प्राण्यांची संख्या वाढली असून, मानव-वन्यजीव संघर्षातही वाढ झाली आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागामार्फत जनजागृती करण्यात येत असून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजनेंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.

जाणून घेऊया सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government.

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन ), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हाळ, मगर, हत्ती, जंगली कुत्रा (ढोल), रोही (निलगाय) आणि माकड/वानर यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू, कायमचे अपंगत्व, गंभीर दुखापत, किरकोळ जखमा. जखमींच्या वर्गवारीनुसार संबंधितांना आर्थिक मदत दिली जाते. अनेक वेळा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य मृत्यू होत नाही परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात.जखमी व्यक्तीला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व त्याला प्रथम शासकीय रूग्णालयात नेऊन व्यक्तीचे प्राण वाचावेत यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. काही वेळा पुरेशी संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते आणि अशा वेळ प्रसंगी जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते.

सदर मृत व्यक्ती, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तींना देण्यात येणारी सध्याची आर्थिक मदत तुलनेने कमी असून त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या. जनप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याच्या मागणीच्या अनुसरुन,वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, कायमचे अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ दुखापत झाल्यास देण्यात येणारी आर्थिक मदत/खर्च या रकमेत पुढीलप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. .

वाघ, बिबट्या, अस्वल, गाय (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, जंगली कुत्रा (ढोल), रोही यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू / कायमचे अपंगत्व / गंभीर दुखापत /(निलगाय) आणि माकड/वानर ह्यांच्या हल्यात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास खालीलप्रमाणे अर्थसहाय्य / खर्चाची प्रतिपूर्ती खालीलप्रमाणे प्रदान करावी.

सदर व्यक्तीचा मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा गंभीर दुखापत झाल्यास पुढील रक्कम आर्थिक मदत द्यावी.

तपशिल आणि व्यक्ती मृत झाल्यास देय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम खालील प्रमाणे.

१. व्यक्ती मृत झाल्यास.

  • देय अर्थसहाय्याची रक्कम रुपये २०,००,०००/- रु.१०,००,०००/-(केवळ दहा लाख रुपये) तात्काळ धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्कम रु. १०,००,०००/- (केवळ दहा लाख रुपये) त्यांच्या मासिक व्याजासह राष्ट्रीयीकृत बँकेतील संयुक्त खात्यात. रक्कम (फिक्स डिपॉझिट) जमा करावी.

२. व्यक्ती कायम अपंग झाल्यास.

  • देय अर्थसहाय्याची रक्कम रुपये ५,००,०००/-

३. व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास.

  • देय अर्थसहाय्याची रक्कम रुपये १,२५,०००/-

४. व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास.

  • देय अर्थसहाय्याची रक्कम औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा.परंतु खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे हे महत्त्वाचे असल्यास त्याची मर्यादा रुपये २०,०००/- (रु. वीस हजार फक्त) प्रती व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.

पशुधन मृत्यू/अपंग/जखमी प्रकरणी द्यावयाची नुकसान भरपाई.

पशुधनाचे नाव (पाळीव प्राणी). देय भरपाईची रक्कम खालीलप्रमाणे आहे.

१. गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यु झाल्यास.

  • बाजार भाव किंमतीच्या ७५% किंवा रु. ७०,०००/- (रु. सत्तर हजार) यापैकी जी कमी असणारी रक्कम.

२. मेंढ्या, शेळ्या आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास* {* वन्यजीव (संरक्षण) (रु. पंधरा हजार फक्त) अधिनियम, १९७२ यापैकी जी रक्कम कमी असेल. (१८ -अ) प्रमाणे दिली जाणार }

  • बाजारभावाच्या ५०% किंवा रु. १५,०००/- (रु. पंधरा हजार) यापैकी जी कमी असलेली रक्कम.

३. गायी, म्हशी, बैल या जनावरांना कायमचे अपंगत्व आले तर.

  • भाव किंमतीच्या ५०% किंवा रु. १५,०००/-(रु. पंधरा हजार फक्त) यापैकी जी कमी असलेली रक्कम.

४.गाय, म्हैस, बैल, मेंढ्या, शेळी व इतर पशुधनाला इजा झाल्यास:

  • वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च हा देण्यात यावा. औषधोपचार शासकीय जिल्हा परिषद पशुवैद्यकीय रुग्णालयात करावे. देय रक्कम मर्यादेच्या बाजारभावाच्या २५% किंवा रु. ५०००/- (रु. पाच हजार) प्रति जनावर यापैकी जी रक्कम कमी असेल, ती भरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे दिली जाईल.Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government.

मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणारी रक्कम.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना देय आर्थिक मदतीच्या रकमेपैकी रु. १०,००,०००/- (रु. दहा लाख) तात्काळ धनादेशाद्वारे प्राप्तकर्त्याला आणि उर्वरित रक्कम रु. १०,००,०००/-(रु. दहा लाख फक्त) रु. ५.०० लाख मुदत ठेवीमध्ये ५ वर्षांसाठी ठेवावेत आणि उर्वरित ५.०० लाख १० वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये ठेवावेत. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवी नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य/नुकसान भरपाईसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास, प्रथम तुम्हाला खालील वन विभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर जावे लागेल.Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government.

ऑनलाइन अर्ज भरा.

महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल विविध RTS अर्ज आणि सेवा दिसतील ज्यामधून तुम्हाला “वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधनाच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मंजूर करणे” किंवा “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य मंजूर करणे” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government.
Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government
Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government
अर्जदार आणि नुकसान भरपाईची माहिती, तसेच आवश्यक तपशील/कागदपत्रे जोडून वरील RTS अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा. अर्ज भरल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक मेसेज येईल व वनविभागाचे अधिकारी नुकसानीचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल.
अर्ज नमुना खालील प्रमाणे.
Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra
Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra
सूचना – अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील उप-वनसंरक्षक/उपविभागीय अधिकारी/वनक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government
Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government

Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government FAQs. 

Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government.

१. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना किती आर्थिक मदत दिली जाते?
उत्तर: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

२. आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
उत्तर: आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर जाऊन संबंधित RTS अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करावा लागेल.

३. Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government साठी अर्ज कसा भरावा?
उत्तर: अर्ज महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी आणि सबमिशनची पुष्टी प्राप्त करावी.

४. अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रिया काय आहे?
उत्तर: अर्ज भरल्यानंतर, वनविभागाचे अधिकारी नुकसानीचा पाहणी दौरा करतात. पाहणीनंतर अर्ज मंजूर झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.

५. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यास किती आर्थिक मदत दिली जाते?
उत्तर: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यास १,२५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

६. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अपंगत्व आल्यास किती आर्थिक मदत मिळते?
उत्तर: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कायमचे अपंगत्व आल्यास ५,००,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

७. जर व्यक्ती किरकोळ जखमी झाली तर काय नुकसान भरपाई दिली जाते?
उत्तर: किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी रुपये २०,०००/- पर्यंत खर्चाची भरपाई दिली जाते.

८. Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government साठी अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: अर्ज भरताना मृत्युदाखल, वैद्यकीय प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

९. पशुधनाचे नुकसान झाल्यास किती नुकसान भरपाई दिली जाते?
उत्तर: गाय, म्हैस, बैल यांच्या मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५% किंवा रुपये ७०,०००/- पर्यंत भरपाई दिली जाते.

१०. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या रकमेची पेमेंट प्रक्रिया कशी असते?
उत्तर: २५ लाख रुपयांपैकी १० लाख रुपये तात्काळ धनादेशाद्वारे दिले जातात, आणि उर्वरित रक्कम (१० लाख रुपये) बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली जाते.Aapli Chawdi Sarkari Yojana Maharashtra Government.

ही माहिती देखील बघा.

Aapali Chawdi 7/12 Digital Notice Board Portal
Aapali Chawdi 7/12 Digital Notice Board Portal

Aapali Chawdi 7/12 Digital Notice Board Portal | डिजिटल 7/12, फेरफार उतारा, मोजणी अर्ज नोटीस बोर्ड !

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

aaplichawdi Google News

aaplichawdi telegram channel

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment