Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process
Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process: नमस्कार मित्रांनो आजकाल खूपच ट्रेडिंग टॉपिक असलेला विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता ह्या या योजनेनुसार राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा १,५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. योजनेसाठी काही ठिकाणी पैसे उकळले जात आहेत तर काही ठिकाणी खूप मोठ्या रांगा, गर्दी होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता ऑनलाईन ॲप लॉंच केला आहे त्यात देखील आपण लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो तर तो कसा भरायचा हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत
लाडकी बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही आता थेट मोबाईवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. (Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process) ऑनलाइन नाही जमल्यास हा अर्ज तहसील कार्यालयात किंवा अंगणवाडी सेविका किंवा सेतू कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीनेही दाखल करता येतो.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process
मोबाइलद्वारे अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी नारी शक्ती दूत (Nari shakti Doot) नावाचे ॲप वापरण्याचा पर्यायही राज्य सरकारने दिला आहे. तुम्ही नारी शक्ती दूत ॲप (Nari shakti Doot) डाउनलोड करून अर्ज भरू शकता. त्यासाठी ॲपवर जाऊन तुमची माहिती भरा आणि तुमची प्रोफाइल तयार करावे.
सगळ्यात आधी खालील लिंकवर क्लिक करून किंवा Google Play Store वरून ‘Nari shakti Doot’ सर्च करून हे ॲप डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot
Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process-ऑनलाइन प्रोसेस स्टेप बाय स्टेप
- स्टेप १:- नारी शक्ती दूत -Nari shakti Doot ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते उघडा: त्यानंतर ज्या महिलेला अर्ज भरायचा आहे. त्या महिलेचा मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा
- स्टेप २:- पुढे ‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि Accept पर्यायावर क्लिक करा. तुम्ही ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केले आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. दिलेल्या बॉक्समध्ये तो OTP टाका आणि ‘Verify OTP’ पर्यायावर क्लिक करा.Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process
- स्टेप ३:- त्यानंतर तुम्हाला अपडेट प्रोफाइल मेसेज मिळेल. तेथे तुमची माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, या पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप ४:- प्रोफाईल अपडेट करताना तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, स्त्रीशक्तीचा प्रकार अपडेट करा.
- स्टेप ५:- प्रोफाईल अपडेट केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या खाली असलेल्या नारी शक्ती दूत (Nari shakti Doot ) पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप ६:- महिलेचे पूर्ण नाव (आधार कार्डानुसार), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्मतारीख, जन्म ठिकाण (गाव/शहर) पिनकोड, संपूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का? हो किंवा नाही. वैवाहिक स्थिती आणि बँक खाते तपशील जस की बँक अकाउंट नंबर आय,एफ,सी कोड आणि बँकेत लिंक असलेला मोबाईल नंबर अशी संपूर्ण माहिती भरा.Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process
- स्टेप ७:- संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (प्रिंट डाउनलोड करून त्यावर आपली सही करा आणि ते पुन्हा अपलोड करा) त्यानंतर बँक पासबुक फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा आणि खालील सेव्ह पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप ८:- तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही.एकदा व्यवस्थित तपासून घ्या आणि अर्ज दाखल करा या पर्यायावर नी संकोचपणे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला OTP मिळेल, तो OTP भरा आणि अर्ज सबमिट करा.
- स्टेप ९:- अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही अर्ज (Your Application) या क्लिक करून तुमच्या अर्जाची सद्य स्थिती तपासू शकता.
वरील संपूर्ण स्टेप फॉलो करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने भरू शकतो.
महत्वाची सूचना-Importance Of Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process
- ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी ग्रामीण महिलांना ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे नोंदणी करावी लागेल आणि शहरी भागातील महिलांनी प्रभाग अधिकाऱ्याकडे (वॉर्ड ऑफिसरकडे-Ward Officer) जाऊन नोंदणी करावी.
सूचना:- या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास १ जुलैपासून सुरुवात झाली असून ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत २०२४ अर्ज भरता येणार आहेत.
- लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता
Majhi Ladki Bahin Yojana Apply Online Process-लाडकी बहीण योजने संबंधित FAQs
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
उत्तर:- या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील महिलांना आर्थिक मदत देणे आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये मानधन दिले जाईल.
२. या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर:- अर्ज करण्यासाठी आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.ऑनलाइन अर्जासाठी “Nari Shakti Doot” अॅप डाउनलोड करून अर्ज भरावा लागेल. ऑफलाइन अर्जासाठी तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका किंवा सेतू कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करू शकता.
३. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया काय आहे?
उत्तर:- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी “Nari Shakti Doot” अॅप डाउनलोड करा. अॅपवर तुमची प्रोफाइल तयार करा आणि आवश्यक माहिती भरा. आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुकचे फोटो अपलोड करून अर्ज सबमिट करा.
४. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली आहे.
५. ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
उत्तर:- ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो.
६. अधिक माहितीसाठी मी कुठे संपर्क साधू शकतो?
उत्तर:- अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या तालुका कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू करण्याच्या मान्यतेबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
👇ही योजना देखील बघा👇
मध केंद्र योजना महाराष्ट्र २०२४!
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.